CAA NRC Protest IPL 2023 : आयपीएलला CAA अन् NRC चं वावडं; खास शहरांसाठी काढला फतवा

आयपीएल सामन्यांदरम्यान CAA-NRC च्या फलकांवर बंदी...
IPL 2023 CAA NRC Protest
IPL 2023 CAA NRC Protestesakal
Updated on

IPL 2023 CAA NRC Protest : आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू होऊन अवघे तीन दिवस होत नाहीत तोच एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आयपीएलच्या सामन्यादरम्यान आता क्रिकेट चाहत्यांना सिटीझन अमेंडमेंट बील (CAA), नॅशनल रजिस्टर सिटीझन (NRC) याबाबतचे कोणतेही फलक मैदानात घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ही सक्त ताकीद दिल्ली, मोहाली, हैदराबाद आणि अहमदाबाद शहरातील सामन्यावेळी देण्यात आली आहे.

IPL 2023 CAA NRC Protest
SRH vs RR IPL : घरच्या मैदानावर हैदराबादचा लाजीरवणा पराभव, राजस्थानने 72 धावांनी दिली मात

चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, सनराईजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांचे पेटीयम इनसाईडर हे अधिकृत तिकीट पार्टनर आहे. यांनी सामन्यावेळी काही वस्तू घेऊन येण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यात सीएए आणि एनआरसीविरूद्ध बॅनरबाजीचा देखील समावेश आहे.

ही सुचना होम मॅचेसवेळी तिकीट व्यवसाय सांभाळणाऱ्या फ्रेंचायजींनी केली असल्याचे समजते. ही गोष्ट सहसा बीसीसीआयशी सल्लामसलत करून घेतली जाते. कारण कोणत्याही संवेदनशील राजकीय किंवा धोरणात्मक निर्णयाच्या बाजूने किंवा विरोधात प्रचार करण्यासाठी आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेचा वापर होऊ नये असा यामागचा उद्येश असतो.

कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच भारतात आयपीएल ही आधीच्या रूपात, प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे याला क्रिकेट चाहत्यांची मोठी उपस्थिती लाभणार आहे. अशा परिस्थितीत फ्रेंचायजींना कोणताही राजकीय बॅनरबाजी यावेळी होऊ नये असे वाटते.

IPL 2023 CAA NRC Protest
Khaleel Ahmed Record in IPL : मेयर्सचा कॅच सोडून खलनायक ठरलेल्या खलील अहमदने केले ढासू रेकॉर्ड

याबाबत दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याला विचारण्यात आल्यावर त्यांनी 'तिकीटचा विषय हा संपूर्णपणे फ्रेंचायजीच्या अखत्यारित येतो. आम्ही फक्त सुविधा पुरवतोय. त्यामुळे आमचा तिकीटांसोबत दिलेल्या सुचनेशी काही संबंध नाही.' असे उत्तर दिले.

याबाबत बीसीसीआयने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, 'फिफाने गेल्या वर्षी कतारमध्ये झालेल्या वर्ल्डकपदरम्यान दिलेल्या सुचना आणि मार्गदर्शक तत्वे तपासा. फिफानुसार राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक संदेश आणि स्लोगनवर पूर्णपणे बंदी होती.'

आयपीएल फ्रेंचायजीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, 'प्रत्येक फ्रेंचायजी बीसीसीआयशी सल्लामसलत करून एक काय करावे आणि काय करू नये याची यादी तयार करते. याला बोर्डाकडून संमदी असते. त्याशिवाय ही यादी वेबसाईटवर प्रसिद्धच करता येत नाही.'

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.