कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमी 800 बळींचा टप्पा पार करणाऱ्या फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने (Muttiah Muralitharan)जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ब्रायन लारा (Brian Lara) यांच्यापेक्षा विरेंद्र सेहवागला (virender sehwag) गोलंदाजी करणे अवघड होते, असे तो म्हणालाय. सचिन तेंडुलकर () तांत्रिकदृष्ट्या समजूतदारपणे फलंदाजी करायचा दुसरीकडे सेहवाग आडव्या तिडव्या फटकेबाजीने गोलंदाजांची धुलाई करायचा, असा किस्सा मुरलीधरनने शेअर केलाय.
क्रिकेट जगतात ऐकेकाळी सचिन-लाराची दहशत होती. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना या दोघांविषयी दहशत असायची. पण माजी फिरकीपटू मुरलीधरनच्या बाबतीत मात्र हे चित्र नव्हते. खुद्द त्यानेच यामागची कहानी सांगितली आहे. सचिन आणि लारा या दोघांना गोलंदाजी करताना कधीच भीती वाटायची नाही. याच कारण त्यांच्या खेळीत सेहवागएवढे नुकसान व्हायचे नाही, असे मुरलीधरन म्हणाला.
.. म्हणून सचिनला बाद करणे कठीण टास्क असायचे
मुरलीधरनने ईएसपीएन-क्रिकइंन्फोमधील कार्यक्रमात आकाश चोप्राशी संवाद साधला. यावेळी मुरलीधरन म्हणाला की, सचिन ज्यावेळी फलंदाजी करायचा त्यावेळी मनात अजिबात भिती नसायची. कारण तो सेहवागप्रणाणे अधिक नुकसान पोहचवायचा नाही. याउलट सेहवाग धुलाई करायचा. सचिन तांत्रिकदृष्ट्या खूपच सक्षम होता. त्यामुळे त्याची विकेट काढणे मुश्किल असायचे, असा उल्लेखही मुरलीधरनने केला.
सेहवाग नेहमी बिनधास्त खेळायचा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा मुरलीधरन म्हणाला की, विरेंद्र सेहवाग नेहमीच बिनधास्तपणे खेळायचा. मॅचमधील पहिला चेंडूचा तो ज्याप्रमाणे सामना करायचा अगदी त्याच तोऱ्यात तो 98-99 धावांवर खेळत असतानाही खेळायचा. टप्पा चुकला तर सेहवाग तो सहज सीमारेषेपलीकडे पाठवायचा, असेही मुरलीधरन म्हणाला.
सेहवागसाठी असायची अशी रणनिती
मुरलीधरन म्हणाला की, ब्रायन लाराला गोलंदाजी करणे देखील सोपे नव्हते. पण तो गोलंदाजांचा सन्मान करायचा. पण सेहवागच्या बाबतीत असे नव्हते. सेहवागला बाद करण्यासाठी आम्ही डीपला फिल्डर ठेवायचो. तो त्यातूनही रिस्क घेणार असे आम्हाला माहित असायचे. लारा-सचिनच्या बाबतीत तसे नसायचे. ही दोघही गोलंदाजांचा सन्मान करायचे. याउलट सेहवाग मनमानीच्या तोऱ्यात खेळायचा.
2 तासात 150 धावा करण्याची क्षमता असणारा खेळाडू
विरेंद्र सेहवाग हा क्रिकेट जगतातील सर्वात स्फोटक फलंदाज होता. तो आपल्या तुफान फटकेबाजीनं सामन्याचे चित्र बदलून टाकायचा. मुरलीधरनने 8 वेळा सेहवागची विकेट घेतलीये. सेहवाग दोन तासांत 150 धावा करण्याची मानसिकता ठेवायचा, असा किस्साही मुरलीधरनने सांगितला. जर एक दिवस खेळलो तर 300 धावा करणार अशा तोऱ्यातच तो खेळायचा असेही मुरलीधरनने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.