Hanuma Vihari: जखमी असतानाही इंजेक्‍शन घेऊन लढला पण आज... टीम इंडियाकडून अन्याय झाल्यानं हनुमाचे डोळे आले भरून

hanuma vihari test
hanuma vihari testsakal
Updated on

Hanuma Vihari : भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणाऱ्या हनुमा विहारीला केवळ 16 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांनी त्याला संघातून वगळले.

ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीत दुखापत झाल्यानंतरही आर अश्विनसोबत 3 तासांहून अधिक वेळ फलंदाजी करून सामना वाचवण्यासाठी हनुमा ओळखला जातो. 2022 मध्ये बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीनंतर हा फलंदाज पुनरागमन करू शकला नाही. आता संघातून वगळल्यानंतर त्याचे डोळे भरून आले.

hanuma vihari test
Brij Bhushan singh: ब्रिजभूषण यांचे 'ते' फोटो आले समोर... पहिलवानांच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठे पुरावे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापत झाल्यानंतरही हनुमा विहारीने 2021 मध्ये इंजेक्शन घेऊन आणि 237 मिनिटे म्हणजेच 3 तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करून सामना वाचवला. ESPN CRICINFO शी बोलताना हनुमा म्हणाला, मला वाटतं जेव्हाही मला संधी मिळाली तेव्हा मी माझी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कदाचित माझी सर्वोत्तम कामगिरी भारतीय संघासाठी पुरेशी नव्हती. पण मी इथे हार मानणार नाही, अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करत राहीन. एक खेळाडू म्हणून तुम्ही खूप काही करू शकता.

hanuma vihari test
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अचानक संघात निवड, 'या' दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वाखाली करणार पदार्पण?

माझ्यासाठी, मला संघातून का वगळण्यात आले हे समजण्यासाठी खूप वेळ लागला आणि मग मी स्वतःला प्रेरित केले की चला पुन्हा प्रयत्न करू आणि पुनरागमन करू. मी माझ्या खेळावर मानसिक आणि शारीरिकरित्या काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. माझे लक्ष फक्त मैदानावर जाऊन जास्तीत जास्त धावा करण्यावर आहे. बाकी सर्व मी निवडकर्त्यांवर सोडले आहे.

hanuma vihari test
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अचानक संघात निवड, 'या' दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वाखाली करणार पदार्पण?

हनुमा विहारीने भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले असून, 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत. काही वेळापूर्वी विहारीने पुनरागमनाची आशा कायम ठेवत म्हटले होते, "जेव्हा अजिंक्य रहाणे वयाच्या 35 व्या वर्षी पुनरागमन करू शकतो, तर मी का नाही. मी आता फक्त 29 वर्षांचा आहे आणि माझ्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.