Not Too Happy With My Fifty Rohit Sharma : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताने विश्वचषकातील विजयी मोहीम सुरू ठेवली आहे. भारताने नेदरलँड्सवर 56 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने गटातील स्थान भक्कम केले आहे. भारताच्या या विजयानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांमुळे संघाने 20 षटकांत 179/2 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सला 123/9 धावा करता आल्या. डावाच्या उत्तरार्धात भारतीय फलंदाजांनी वेग पकडला असला, तरी ते पॉवर प्लेमधील संथ सुरूवाती केली होती. पहिल्या नऊ षटकांत 53/1 पर्यंत पोहोचले. 10व्या षटकानंतर रोहितने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली.
नेदरलँड्सविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, पाकिस्ताननंतरच्या त्या मोठ्या विजयानंतर, आमच्यासाठी भाग्याची गोष्ट होती की आमच्याकडे पुढच्या सामन्यासाठी थोडे दिवस होते. त्या सामन्यानंतर लगेचच आम्ही सिडनीला आलो. नेदरलँड्सचे कौतुक करताना रोहित म्हणाला की सुपर-12 मध्ये ते ज्या प्रकारे पात्र झाले त्याचे श्रेय त्याला जाते.
पुढे रोहित म्हणाला की, आम्ही सुरुवातीला थोडे संथ खेळलो पण विराट मला फक्त एकच गोष्ट बोललो होतो ती म्हणजे या विकेटवर थोडा वेळ थांबून मोठे फटके खेळायचे आहेत. मी माझ्या अर्धशतकावर खूश नाही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे धावा झाल्या. रोहितने 35 चेंडूत अर्धशतकाचा टप्पा गाठला असला तरी त्याच्या धावसंख्येच्या वेगावर तो खूश नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.