French Open Final : अल्काराझला हरवून जोकोविच अंतिम फेरीत

Novak Djokovic French Open 2023
Novak Djokovic French Open 2023
Updated on

French Open Final Novak Djokovic : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने विक्रमी २३वे ग्रैंडस्लॅम जिंकण्याच्या दिशेने शुक्रवारी शानदार पाऊल टाकले आहे. तिसरा मानांकित जोकोविच याने अव्वल मानांकित कार्लोस अल्काराझ याच्यावर ६-३, ५-७, ६-१, ६-१ अशी चार सेटमध्ये मात केली आणि सातव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.

जोकोविच अल्काराझ यांच्यामधील उपांत्य फेरीची लढत अनुभवी - युवा अशीच समजली जात होती. स्पेनचा अल्काराझ जोकोविचला पराभूत करीत टेनिस विश्वात नव्या पर्वाला सुरुवात करील, अशी चर्चा रंगू लागली होती; पण जोकोविचने पहिला सेट ६-३ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये अल्काराझ याने झोकात पुनरागमन केले. दोन्ही खेळाडूंमध्ये ५-५ अशी बरोबरी असताना अल्काराझ याने पुढील दोन गेम जिंकत हा सेट ७-५ असा जिंकला आणि अत्यंत महत्त्वाच्या लढतीत १-१ अशी बरोबरी साधली.

Novak Djokovic French Open 2023
WTC Final 2023 Day 3 : झुंजार अजिंक्य-शार्दुलनं दाखवून दिलं अजूनही जिंकू शकतो, मानसिकताच कळीचा मुद्दा

दुसरा सेट गमावल्यानंतर जोकोविच याने पुढील दोन सेटमध्ये थाटात खेळ केला. जोकोविचच्या झंझावातात अल्काराझचा निभाव लागला नाही. जोकोविचने तिसरा सेट व चौथा सेट प्रत्येकी ६-१ अशाच फरकाने जिंकला आणि अंतिम फेरीत पाऊल ठेवले. जोकोविचने ही लढत तीन तास २३ मिनिटांमध्ये जिंकली.

तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकायचीय

नोवाक जोकोविच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या सातव्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी त्याला ही स्पर्धा दोन वेळा जिंकता आली आहे. जोकोविचने २०१६ व २०२१ यादरम्यान फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. तसेच २०१२, २०१४, २०१५ व २०२० या दरम्यान त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. जोकोविचने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले असेल.

Novak Djokovic French Open 2023
Marnus Labuschagne Sleeping : डुलकी काढणाऱ्या मार्नसची सिराजनं उडवली झोप; ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल

विक्रमी जेतेपदाकडे वाटचाल

नोवाक जोकोविच याने उपांत्य फेरीतील विजयासह विक्रमी अजिंक्यपदाकडे अगदी रुबाबात वाटचाल केली आहे. जोकोविच व राफेल नदाल यांनी सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकाविली आहेत; पण आता जोकोविचला २३व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. येत्या रविवारी फ्रेंच ओपन टेनिस ग्रैंडस्लॅम पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.