Novak Djokovic : रोम ओपनदरम्यान चाहत्याला स्वाक्षरी देताना जोकोविचसोबत घडला विचित्र प्रकार

Novak Djokovic
Novak Djokovic Bottle Accidentesakal
Updated on

Novak Djokovic Bottle Accident : नोव्हाक जोकोविच सध्या रोम ओपनमध्ये खेळत आहे. त्याने फ्रान्सच्या कोरेनटीन मोउटेटवर विजय मिळवला. सामन्यानंतर जोकोविच चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. त्याचदरम्यान, एक अजब प्रकार त्याच्यासोबत घडला.

नोव्हाक जोकोविचने कोरेनटीनचा 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सामना झाल्यानंतर जोकोविच चेंजिंग रूमकडे जाताना चाहत्यांनी त्याच्याकडे स्वाक्षरीची मागणी केली. जोकोविच चाहत्यांना स्वाक्षरी देत असतानाच त्याच्या डोक्यावर हार्ड प्लास्टिकची बॉटल आपटली.

जोकोविच वेदनेनं कळवळत खालीच बसला. बॉटल हार्ड असल्याने आणि वरून ती डोक्यावर आदळल्याने जोकोविचला फार वेदना होत होत्या. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी जोकोविचला आत नेलं.

Novak Djokovic
James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

दरम्यान, जोकोविचच्या प्रकृतीबाबत एएफपीने माहिती देण्याची विनंती केली होती. मात्र स्पर्धा समितीने यावर अजून कोणतंही उत्तर दिलेलं नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जोकोविच ठिक असून तो चिलीच्या अलेजांड्रो ताबिलो विरूद्ध खेळणार आहे.

जोकोविच फ्रेंच ओपनची जोरदार तयारी करत असून तो फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. राफेल नदालने फ्रेंच ओपन 10 पेक्षा जास्तवेळा जिंकली आहे. आता हे टायटल जोकोविचला आपल्या नावावर करायचं आहे.

टॉप सिडेड जोकोविच नुकताच 37 वर्षाचा झाला आहे. तो आता रोलँड गार्रोस स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे.

Novak Djokovic
Rishabh Pant Suspended : कर्णधार ऋषभ पंतवर BCCIची मोठी कारवाई; घातली एका सामन्याची बंदी, जाणून घ्या कारण

दरम्यान, जोकोविचने या घटनेनंतर ट्विट केलं. तो म्हणाला की, 'तुम्ही काळजीपोटी केलेल्या मेसेजसाठी धन्यावाद, हा एक अपघात होता आणि मी ठिक आहे. हॉटेल रूममध्ये आराम करत आहे. मी डोक्यावर आईस पॅक ठेवला आहे. रविवारी भेटू.'

(Tennis Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.