US Open अन् जोकोविचच्या आडवी येणार 'कोरोना' लस?

Novak Djokovic US Open Participation In Doubt Due Not Taking Corona Vaccination
Novak Djokovic US Open Participation In Doubt Due Not Taking Corona Vaccinationesakal
Updated on

Novak Djokovic : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने नुकतेच विम्बल्डनवर (Wimbledon 2022) आपले सातव्यांदा नाव कोरले. याचबरोबर त्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम (Grand Slam) जिंकणाऱ्यांच्या यादीत रॉजर फेडररला देखील मागे टाकले. आता त्याची नजर युएस ओपन (US Open 2022) आणि राफेल नदलाच्या सर्वाधिक 22 ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डवर आहे.

मात्र जोकोविचच्या युएस ओपन मिशनमध्ये कोरोनाची लस (Corona Vaccination) आडवी येण्याची शक्यता आहे. नोव्हक जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास नकार दिला आहे. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियामधून देखील आल्या पावली माघारी परतावे लागले होते. आता पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या युएस ओपन स्पर्धेत देखील जोकोविचला अमेरिकेत लसीकरण झाले नसल्याने प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे.

Novak Djokovic US Open Participation In Doubt Due Not Taking Corona Vaccination
शतक जाऊ द्या, विराटने पूर्ण सिरीजमध्ये जरी 101 धावा काढल्या तरी...

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणला की, 'सध्याच्या घडीला मी अमेरिकेला जाऊ शकत नाही. मी एक सकारात्मक बातमीची वाट पाहत आहे. मात्र यासाठी फार वेळ शिल्लक नाही. मला पुढे काय होणार माहिती नाही. आशा अजून जिवंत आहे.'

जोकोविच पुढे म्हणाला की, 'मला युएस ओपन खेळायला आवडेल मात्र जर खेळण्याची संधी मिळाली नाही तर तो काही जगाचा अंत असणार नाही. यापूर्वीही मी ग्रँड स्लॅममधून माघार घेतली होती. माझ्या दृष्टीने शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहणे हे फार महत्वाचे आहे. मी अजून दीर्घ काळ खेळू शकतो त्यामुळे भविष्यातही मला चांगल्या संधी मिळतील.'

Novak Djokovic US Open Participation In Doubt Due Not Taking Corona Vaccination
IPL खेळता पण भारताकडून खेळताना...; विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंवर गावसकर संतापले

नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन ओपन स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या निक कर्गिओसचा 4–6, 6–3, 6–4, 7–6(7–3) असा चार सेटमध्ये पारभव करत आपले सातवे विम्बल्डन जिंकले. त्याची एकूण ग्रँड स्लॅमची संख्या आता 21 झाली आहे. तो सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम नावावर असणाऱ्या राफेल नदालच्या फक्त एक ग्रँड स्लॅम टायटल मागे आहे.

याबाबत जोकोविच म्हणतो की, 'लोकं मला माझ्या रेकॉर्डबद्दल विचारत आहेत. माझा आवडता नंबर कोणता. माझे आवडे टायटल कोणते. यावेळी मी त्यांना माझे प्रेरणास्थान असलेल्या कोबे ब्रायंटचे एक वाक्य कोट करतो. माझे आवडते टायटल हे माझे पुढेच टायटल असेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.