Novak Djokovic French Open 2023 : नोवाक जोकोविचची विजयी घोडदौड!

जोकोविचने फ्रेंच ओपनमध्ये केला धमाका
Novak Djokovic French Open 2023
Novak Djokovic French Open 2023
Updated on

Novak Djokovic French Open 2023 : टेनिस विश्‍वातील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच याने शुक्रवारी विजयी घोडदौड कायम ठेवली. त्याने स्पेनच्या ॲलेक्झांड्रो फोकिना याच्यावर तीन सेटमध्ये विजय मिळवला आणि फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत धडक मारली.

तिसरा मानांकित जोकोविचला पुरुष एकेरी गटात विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने पहिल्या दोन सेटमध्ये ७-६ अशा फरकाने विजय मिळवले. दबावाखाली जोकोविचने आपला खेळ उंचावला. तिसरा सेट मात्र त्याने ६-२ असा सहज जिंकला.

Novak Djokovic French Open 2023
Ruturaj Gaikwad: भावा वहिनीनी जिंकले मन! ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने मैदानात धोनीच्या पडल्या पाया अन्...

या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या बेलारुसच्या एरिना सबालेंका हिने रशियाच्या कमिला राखीमोवा हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करीत महिला एकेरीच्या अंतिम १६ फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरी मानांकित सबालेंका हिने क्रमवारीत ८२ व्या स्थानावर असलेल्या कमिला हिच्याविरुद्धच्या लढतीत वर्चस्व दाखवले. बेलारुसच्या टेनिसपटूने पहिला सेट ६-२ अशा फरकाने जिंकत आघाडी घेतली. सबालेंका हिने हा गेमही ६-२ असा जिंकला व आगेकूच केली. पहिल्यांदाच तिने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठली हे विशेष.

Novak Djokovic French Open 2023
विजेत्या हॉकीपटूंना प्रत्येकी दोन लाख; आशिया कप जिंकून भारतीय संघ ज्युनियर वर्ल्डकपसाठी पात्र

तिसरी मानांकित खेळाडू हरली

तिसरी मानांकित खेळाडू जेसिका पेगुला हिला शुक्रवारी पराभवाचा सामना करावा लागला. बेल्जियमची एलीस मर्टेन्स हिने पेगुला हिच्यावर ६-१, ६-३ अशी मात केली. मर्टेन्स हिने एक तास व २२ मिनिटांमध्ये विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()