'नुपूर शर्मा' वक्तव्यावर पाकिस्तानातून प्रतिक्रिया; व्यंकटेश प्रसाद म्हणाला..

Nupur Sharma Raw venkatesh prasad Silence Pakistani Twitter User
Nupur Sharma Raw venkatesh prasad Silence Pakistani Twitter Useresakal
Updated on

नवी दिल्ली : भारताचा माजी वेगावान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने नुपूर शर्मांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. व्यंकटेश प्रसादच्या या प्रतिक्रियेवर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधूनही अनेक नेटकऱ्यांनी व्यंकटेश प्रसादवर टीका केली आहे. पाकिस्तानचा एक युजर मुरादने 1996 वर्ल्डकप दरम्यान, आमिर सोहेल बरोबर झालेल्या वादाची आठवण करून दिली. (Nupur Sharma Raw venkatesh prasad Silence Pakistani Twitter User)

Nupur Sharma Raw venkatesh prasad Silence Pakistani Twitter User
गुरूनैदूने युवा वेटलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये घडवला 'सुवर्ण' इतिहास

व्यंकटेश प्रसादने देखील मुरादला कडक प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मुरादने आपले ट्विट डिलीट करून पळ काढला. मात्र व्यंकटेश प्रसादचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माचा पुतळ्याला कर्नाटकमधील बेळगावमध्ये फाशी देण्यात आली होती. व्यंकटेश प्रसादने यावर 'कर्नाटकमध्ये नुपूर शर्माचा पुतळा लटकावण्यात आला आहे. विश्वास बसत नाही की हा 21 व्या शतकातला भारत आहे. मी सर्वांना विनंती करतो की राजकारण बाजूला सारा. हे खूप होतोयं.'

Nupur Sharma Raw venkatesh prasad Silence Pakistani Twitter User
IPL प्रक्षेपण हक्क मिळवण्यात सोनी टीव्हीने मारली बाजी?

1996 च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताने पाकिस्तानविरूद्ध पहल्यांदा फलंदाजी करत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 288 धावा केल्या होत्या. भारताकडून नवज्योज सिंग सिद्धूने 93 तर अजय जडेजाने 45 धावांची खेळी केली होती. वसिम अक्रमच्या अनुपस्थितीत आमिर सोहेल पाकिस्तानचा कर्णधार होता.

पाकिस्तानने 288 धावांचा पाठलाग करताना धडाकेबाज सुरूवात केली. सोहेल आणि सईद अन्वर यांनी 11 षटकात 84 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र अन्वर बाद होऊन माघारी परतला. दुसऱ्या बाजूने सोहेल चांगलीच झुंज देत होता. दरम्यान, सोहलने व्यंकटेश प्रसादला चौकार लगावला आणि त्याला डिवचण्यास सुरूवात केली. तुला त्याच ठिकाणी अजून एक चौकार मारणार असे तो सांगत होता. मात्र व्यंकटेश अय्यरने आमिर सोहेलचा पुढच्याच चेंडूवर त्रिफळा उडवत त्याला हावभावाने पॅव्हेलियनचा रस्ता धरायला सांगितला. भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की ही घटना आजही चाहत्यांना आठवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()