AUS vs NZ : हेडचे वर्ल्डकप पदार्पण दणक्यात साजरं, दोन महिन्यानं बॅट घेतली हातात अन् केला मोठा विक्रम

AUS vs NZ : हेडचे वर्ल्डकप पदार्पण दणक्यात साजरं, दोन महिन्यानं बॅट घेतली हातात अन् केला मोठा विक्रम
Updated on

Nz vs Aus World Cup 2023 Travis Head : ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात धरमशालामध्ये वादळ आणले. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आहे. धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ट्रॅव्हिसने अवघ्या 59 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.

ट्रॅव्हिसच्या या स्फोटक खेळीमुळे मोठा विक्रम केला आहे. तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

या यादीत ग्लेन मॅक्सवेल पहिल्या क्रमांकावर आहे. याच वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 40 चेंडूत शतक झळकावून मॅक्सवेलने आपलाच जुना विक्रम मोडला. याआधी ऑस्ट्रेलियाकडून वनडेत सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम मॅक्सवेलच्या नावावर होता. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये मॅक्सवेलने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या होत्या.

मॅक्सवेलनंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जेम्स फॉकनरचा क्रमांक येतो. फॉकनरने 2013 मध्ये बेंगळुरू वनडेमध्ये टीम इंडियाविरुद्ध 57 चेंडूत शतक झळकावले होते. हेडने 109 धावांच्या खेळीत (67 चेंडू, 10 चौकार आणि 7 षटकार) मारत ऑस्ट्रेलियासाठी वनडेतील तिसरे जलद शतक झळकावले. आणि या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे जलद शतक झळकावले, पहिलाच वर्ल्ड कप खेळताना पहिल्याच सामन्यात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्येही त्याने आपले नाव नोंदवले आहे.

ऑस्ट्रेलियासाठी WC पदार्पणात शतके

110 - ट्रेव्हर चॅपेल विरुद्ध IND, नॉटिंगहॅम 1983

110 - जिऑफ मार्श विरुद्ध IND, चेन्नई 1987

143* - अँड्र्यू सायमंड्स विरुद्ध PAK, जोहान्सबर्ग 2003

135 - आरोन फिंच विरुद्ध ENG, मेलबर्न 2015

109 - ट्रॅव्हिस हेड विरुद्ध NZ, धरमशाला 2023

ट्रॅव्हिस हेडला सप्टेंबरमध्ये दुखापत झाली होती. यामुळे तो गेल्या एक महिन्यापासून ऑस्ट्रेलियन संघाबाहेर होता. नुकताच तो भारतात परतला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पाच सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव जाणवली. सलामीच्या जोडीच्या अपयशामुळे कांगारू संघाला सुरुवातीचे दोन्ही सामने गमवावे लागले. ट्रॅव्हिसच्या आगमनानंतर ऑस्ट्रेलियासाठी सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.