NZ vs PAK : आफ्रिकानंतर क्रिकेटमध्ये सर्वात मोठा 'चोकर्स', 15 वेळा विजेतेपदाच्या जवळ मात्र...

दक्षिण आफ्रिका नंतर हा संघ क्रिकेटमधील सर्वात मोठा चोकर्स मानला जातो.
new zealand icc t20 world cup result records
new zealand icc t20 world cup result recordssakal
Updated on

New Zealand T20 World Cup Records : टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत 9 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमने-सामने येणार आहेत. न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटचा विश्वविजेता बनण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर अनेकवेळा विजेतेपदापासून दूर राहिलेल्या किवी संघाला पाकिस्तानचे आव्हान पेलायचे आहे, एकीकडे पाकिस्तान जो मोठ्या मुश्किलीने उपांत्य फेरीत आला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड या विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे.

new zealand icc t20 world cup result records
T20 World Cup 2022 Fastest Ball : वेगाच्या 'वेडे'पणात कोण आहे आघाडीवर?

दक्षिण आफ्रिका नंतर न्यूझीलंड हा क्रिकेटमधील सर्वात मोठा चोकर्स मानला जातो. आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंड जेतेपदापर्यंत इतक्या वेळा गेला की हाताच्या बोटावर मोजता येणार नाही. 2015 ते 2021 पर्यंत, किवी संघ 3 वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विश्वविजेता होण्यापासून वंचित राहिला, पण 15 वेळा विजेतेपदाच्या जवळ येऊन न्यूझीलंड चोकर्स राहणार की विजेतेपद पटकावणारा हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

new zealand icc t20 world cup result records
T20 WC : 'या' अंपायर पासून पाकिस्तानची सुटका नाहीच; सेमी फायनल ठरणार वादग्रस्त?

आयसीसीचे जेतेपद न्यूझीलंडला केवळ दोनदाच जिंकता आले आहे. त्याचवेळी त्यांना 15 वेळा रिकाम्या हाताने परतावे लागले. न्यूझीलंड 4 वेळा आयसीसी स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे. 1975 ते 2021 पर्यंतचे रेकॉर्ड त्याच्या अपयशाचे साक्षीदार आहेत. 1999 पर्यंत किवी संघ विश्वचषकात उपांत्य फेरीच्या आतच आपल्यावर संपुष्टात आणत होता, परंतु 2000 मध्ये प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. यानंतर तो 9 वेळा फायनल आणि सेमीफायनल हरला. ज्यामध्ये 2009 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी, 2015 आणि 2019 एकदिवसीय विश्वचषक आणि 2021 टी-20 विश्वचषक फायनलचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.