Cricket News: किवींविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप! कर्णधारने दिला राजीनामा

न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप
 dimuth karunaratne-to-step-down-from-sri-lankas-test-captaincy
dimuth karunaratne-to-step-down-from-sri-lankas-test-captaincysakal
Updated on

Cricket News in Marathi: न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप झाला आहे. त्याचा परिणाम कसोटी संघाच्या कर्णधारपदावर झाला आहे. दिमुथ करुणारत्नेने श्रीलंका कसोटी संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडमध्ये 0-2 अशा कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्याने श्रीलंकेच्या निवड समितीसमोर आपले इरादे व्यक्त केले. करुणारत्नेने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(Dimuth Karunaratne to step down from Sri lankas Test Captaincy)

 dimuth karunaratne-to-step-down-from-sri-lankas-test-captaincy
WTC 2021-23 लीग स्टेज संपली! फायनल पॉइंट टेबलची स्थिती अन् बक्षीस रक्कम जाणून घ्या!

दिमुथ करुणारत्नेच्या म्हणण्यानुसार, त्याने श्रीलंकेच्या निवडकर्त्यांना पुढील डब्ल्यूटीसी सायकलसाठी नवीन कसोटी कर्णधार निवडण्यास सांगितले आहे, कारण तो आयर्लंड मालिकेनंतर कसोटी कर्णधार पदावरून पायउतार होत आहे. मात्र करुणारत्नेच्या या निर्णयावर निवड समितीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 dimuth karunaratne-to-step-down-from-sri-lankas-test-captaincy
NZ vs SL: वेलिंग्टन कसोटीत श्रीलंकेचा 4 दिवसांत पराभव! न्यूझीलंडने केला क्लीन स्वीप

करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्विप झाला होता. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याचा 1 धावाने पराभव झाला. वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा संघ एक डाव आणि 58 धावांनी पराभूत झाला.

आता श्रीलंकेला आयर्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. मायदेशातील या दोन सामन्यांच्या मालिकेनंतर करुणारत्नेने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.