Yuvraj Singh: ODI क्रिकेटची होणार एक्झिट? युवराज सिंगने व्यक्त केली गंभीर चिंता

विश्वविक्रमी विजयानंतरही युवराज सिंगने उपस्थित केला प्रश्न
odi cricket is dying yuvraj singh
odi cricket is dying yuvraj singh sakal
Updated on

IND vs SL 3rd ODI Yuvraj Singh : भारताने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा धुव्वा उडवला. शिवाय हा सामना सर्वाधिक धावांनी जिंकण्याचा विश्वविक्रमही केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 300 हून अधिक धावांनी सामना जिंकणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे.

याशिवाय टीम इंडियाच्या शुभमन गिल आणि विराट कोहलीसह इतर खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम केले. मात्र असे असतानाही भारताचा माजी अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता संघाचा खेळाडू युवराज सिंग चिंतेत आहे.

odi cricket is dying yuvraj singh
Rishabh Pant Sister: पंतच्या अपघातानंतर 15 दिवसांनी बहिणीची पहिली पोस्ट व्हायरल; म्हणाली...

भारतीय फलंदाजीदरम्यान शुबमन गिल आणि विराट कोहली मैदानात असताना युवीने एक ट्विट केले जे व्हायरल झाले. भारतीय अष्टपैलू खेळाडूने या ट्विटमध्ये एकदिवसीय क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली. युवराज सिंगने लिहिले, 'शुबमन गिल शानदार खेळला, आशा आहे की तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावेल. दुसऱ्या टोकाला विराट कोहलीही शानदार फलंदाजी करत आहे, पण माझ्यासाठी चिंतेची बाब म्हणजे अर्धे रिकामे स्टेडियम. वनडे क्रिकेट संपत आहे का?

odi cricket is dying yuvraj singh
VIDEO: लाइव्ह मॅचमध्ये मोठा अपघात! दोन खेळाडू जखमी, स्ट्रेचरवरून बाहेर अन्...

गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत कसोटी आणि टी-20 क्रिकेटने चाहत्यांच्या हृदयात खूप जागा निर्माण केली आहे. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू केल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे, तर गेल्या दोन वर्षांत दोन टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे सर्व संघांनी भरपूर सामने खेळले.

अशा परिस्थितीत एकदिवसीय क्रिकेटच्या लोकप्रियतेत बरीच घट झाली आहे. इरफान पठाणनेही युवराज सिंगच्या या ट्विटचा आनंद घेतला. इरफानने युवीला पुन्हा मैदानात उतरण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.