IND vs SA ODI Series : भारताने रचला इतिहास! तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी मात, मालिका 2-1 ने जिंकली

भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa Match) अखेरच्या सामन्यात ७८ धावांनी पराभव करून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
IND vs SA ODI Series
IND vs SA ODI Series esakal
Updated on
Summary

संजू सॅमसनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) झळकावलेले पहिले वहिले शतक, त्यानंतर तिलक वर्माची अर्धशतकी खेळी, तसेच रिंकू सिंगचा ३८ धावांचा तडाखा यामुळे भारताने ८ बाद २९६ धावांपर्यंत मजल मारली.

पार्ल : संजू सॅमसनचे (Sanju Samson) शतक आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कमाल, यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa Match) अखेरच्या सामन्यात ७८ धावांनी पराभव करून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २९६ धावा करणाऱ्या भारताने सामना विजयाच्या दिशेने पाऊल टाकले होते. परंतु दुसऱ्या सामन्यातील शतकवीर टॉनी जॉर्जीने आजही ८१ धावांची खेळी केली, तो मैदानावर असेपर्यंत सामना समतोल स्थितीत होता. मात्र अर्शदीपने यॉर्करवर त्याला पायचीत टिपले. ३ बाद १६६ वरून आफ्रिकेची ६ बाद १७७ अशी घसरगुंडी झाली, तेथूनच सामना भारताच्या बाजूने झुकला. अर्शदीपने चार विकेट मिळवून शानदार कामगिरी केली.

IND vs SA ODI Series
KL Rahul : धोनीनंतर केएलच! जे ऋषभ पंतला जमलं नाही ते राहुलनं करून दाखवलं

संजू सॅमसनचे शतक

संजू सॅमसनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) झळकावलेले पहिले वहिले शतक, त्यानंतर तिलक वर्माची अर्धशतकी खेळी, तसेच रिंकू सिंगचा ३८ धावांचा तडाखा यामुळे भारताने ८ बाद २९६ धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त नसल्यामुळे रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने आक्रमक सुरुवात केली असली, तरी त्याची मजल २२ धावांपर्यंतच मर्यादित राहिली. पहिल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतके करणारा साई सुदर्शन आज केवळ १० धावा करू शकला त्यामुळे भारताची २ बाद ४९ अशी अवस्था झाली होती.

IND vs SA ODI Series
Sunil Gavaskar On Sanju Samson : याची कारकीर्दच बदलणार... गावसकरांना संजूच्या शतकी खेळीतील कोणती गोष्ट जास्त भावली?

संघाला गरज असताना सॅमसनने विश्वास सार्थ ठरवणारी १०८ धावांची शतकी खेळी साकारली. सुरुवातीला त्याने संयमावर भर दिला. डाव उभारण्यासाठी त्याचे प्रयत्न होते. कर्णधार केएल राहुल २१ धावा करून बाद झाल्यावर सॅमसनने तिलक वर्माच्या साथीने शतकी भागीदारी करून डाव सावरला. पण धावांची सरासरी मर्यादित असल्यामुळे भारतीय संघ सव्वादोनशेपर्यंत मजल मारेल, असे चित्र होते.

शतकाच्या जवळ पोहचत असताना सॅमसनने गिअर बदलले. तिलक वर्मानेही चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे धावांचा वेग वाढू लागला. तिलक बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने आपल्या शैलीत टोलेबाजी केली, त्यामुळे भारतीय संघाला तिनशे धावांच्या जवळ जाता आले. वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांचेही छोटेखानी योगदान मोलाचे ठरले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ८ बाद २९६ (संजू सॅमसन १०८ - ११४ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, तिलक वर्मा ५२ - ७७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, रिंकू सिंग ३८ -२७ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, नँद्रे बर्गर ९-०-६४-२, ब्युरन हेन्रिक्स ९-०-६३-३, वियान मुल्डर ७-०-३६-१). दक्षिण आफ्रिका : ४५.५ षटकांत सर्वबाद २१८ (टॉनी जॉर्जी ८१ - ८७ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, एडन मार्करम ३६, हेन्रिच क्लासेन २१, अर्शदीप सिंग ९-१-३०-४, आवेश खान ७.५-०-४५-२, वॉशिंग्टन सुंदर १०-०-३८-२, अक्षर पटेल १०-०-४८-१)

IND vs SA ODI Series
Aditi Swami : बोटे सुजली, जखमा झाल्या... मात्र ती थांबली नाही

सर्वोत्तम धावसंख्या

  • ३५१/३ वि. केनिया, पार्ल २००१

  • ३११/२ वि. नामिबिया, पिटरमारिट्झबर्ग २००३

  • ३०३/६ वि. दक्षिण आफ्रिका, केपटाऊन २०१८

  • २९६/८ वि. दक्षिण आफ्रिका, पार्ल २०२३

  • २९२/६ वि. श्रीलंका, जोहान्सबर्ग २००३

भारताची वाटचाल

  • १ ते १९ षटके ः १०२/३ ः सरासरी ५.३६

  • २० ते ३२ षटके ः ३७/० ः सरासरी २.८४

  • ३३ ते ५० षटके ः १५७/५ ः सरासरी ८.७२

सॅमसनची वाटचाल

  • पहिल्या ९० चेंडूत ६४ धावा.

  • अखेरच्या २४ चेंडूत ४४ धावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.