एकदिवसीय विश्वचषक 2023 अखेर संपला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी भारतीय संघाने गमावली सली तरी.आगामी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी अनेक दिलासादायक बाबीसमोर आल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताने शानदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादव वगळता प्रत्येक खेळाडूने कोणत्या ना कोणत्या सामन्यात सामना जिंकून देणारी कामगिरी केली. रोहित, विराट आणि श्रेयस अय्यरने चांगल्या धावा केल्या. त्याचबरोबर लोकेश राहुलने यष्टिरक्षक म्हणून खूप प्रभाविपणे जबाबदारी पार पाडली. मोहम्मद शमी आणि बुमराह यांची कामगिरी देखील चांगली राहिली तर फिरकी गोलंदाज जडेजा आणि कुलदीपने विरोधी फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचायला लावले. आज आपण या विश्वचषकातून भारतीय संघाला काय मिळाले? याचा अंदाज घेणार आहोत.
या विश्वचषकात भारतीय कर्णधार रोहित शर्माने चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माने 11 सामन्यात 54.27 च्या सरासरीने आणि 125.94 च्या स्ट्राईक रेटने 597 धावा केल्या. त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली.तर रोहितला एका सामन्यात खातेही उघडता आले नाही. मात्र, त्याने भारतीय संघाला वेगवान सुरूवात करून देण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली. या कारणास्तव त्याने या स्पर्धेत 66 चौकार आणि 31 षटकार मारले. रोहित येत्या एक-दोन वर्षांत तो अशीच कामगिरी करून भारतासाठी अनेक सामने जिंकू शकतो.
विराट कोहलीने या विश्वचषकातील 11 सामन्यांच्या 11 डावात 765 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 95.62 आणि स्ट्राइक रेट 90.31 होता. त्याने तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकवली . एका सामन्यात, तो खाते न उघडता बाद झाला, परंतु उर्वरित 10 डावांमध्ये त्याने 50 हून अधिक नऊ वेळा धावा केल्या. त्याचबरोबर तीन सामन्यांत नाबाद देखील राहिला. कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे भारतीय क्रिकेटसाठी खूप आनंददायी आहे. तो असाच खेळला तर भविष्यात सचिनचा शंभर शतकांचा विक्रम तो मोडू शकतो आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देऊ शकतो.
श्रेयस अय्यर
या विश्वचषकात भारतासाठी सर्वात आनंददायी बाब म्हणजे श्रेयस अय्यरची फलंदाजी. आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. शस्त्रक्रियेनंतर त्याने विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये पुनरागमन केले. तो फार चांगला फॉर्ममध्ये दिसत नव्हता, पण या विश्वचषकात त्याने अप्रतिम कामगिरी केली. श्रेयसने 11 डावात 530 धावा केल्या. त्याची सरासरी 66.25 आणि स्ट्राईक रेट113.24 होता. मधल्या फळीतील फलंदाजीचे दीर्घकाळ चाललेली समस्या संपवली. विकेट लवकर पडल्यावर तो डाव सावरू शकतो आणि शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा काढण्याची क्षमताही त्याच्यात आहे. त्याचे वयही 28 वर्षे आहे, त्यामुळे तो दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघात दिर्घकाळ खेळू शकतो.
लोकेश राहुल
31 वर्षीय लोकेश राहुलने या विश्वचषकात आपल्या प्रतिभेला पूर्ण न्याय दिला. मधल्या फळीत फलंदाजी करत त्याने संघाला प्रत्येक वेळी दबावातून बाहेर काढले आणि गरज पडेल तेव्हा झटपट धावाही केल्या. या स्पर्धेत त्याने 10 डावात 452 धावा केल्या. त्याची सरासरी 75.33 आणि स्ट्राइक रेट 90.76 होता. अंतिम फेरीतही त्याने दबावाच्या परिस्थितीत 66 धावांची शानदार खेळी केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे विकेटकीपिंग. डीआरएसपासून ते कठीण झेल घेण्यापर्यंत राहुलने चांगलेच प्रभावित केले. तो पुढील विश्वचषकापर्यंत भारतीय संघासाठी खेळू शकतो.
मोहम्मद शमी
या विश्वचषकात मोहम्मद शमीची गोलंदाजी भारतासाठी सर्वात प्रभावी ठरली. मात्र, शमी बराच काळ भारताकडून खेळत आहे आणि बऱ्याच दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. असे असूनही या विश्वचषकात त्याने जे केले ते ऐतिहासिक आहे. शमीने भारतीय खेळपट्ट्यांवर सातत्याने विकेट घेतल्या आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. इतर खेळाडूंनी 11 सामने खेळले, मात्र शमीने अवघ्या सात सामन्यांमध्ये सर्वांना मागे टाकले. 33 वर्षीय शमी आगामी काळात संघासाठी अनेक सामने जिंकू शकतो.
कुलदीप-जडेजाची फिरकी जोडी
कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीनेही या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. या दोघांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा चांगली गोलंदाजी केली आणि मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या. त्यामुळे बहुतांश सामन्यांमध्ये विरोधी संघांना भारताविरुद्ध मोठी भागीदारी करता आली नाही. याच कारणामुळे संपूर्ण स्पर्धेत भारताविरुद्ध 300 धावा झाल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.