World Cup 2023 : BCCI नं केली गोची, ICC ने प्रस्ताव धुडकावला; पाकला चेन्नईतच करावा लागणार कडवट अफगाणींचा सामना

World Cup 2023 Pakistan Vs Afghanistan
World Cup 2023 Pakistan Vs Afghanistan esakal
Updated on

World Cup 2023 Pakistan Vs Afghanistan : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधील सामन्यांवरून फारच नखरे करत आहे. त्यांना अहमदाबादमध्ये भारताविरूद्ध सामना खेळण्यात अडचण होती. त्यानंतर आता त्यांनी चेन्नईत अफगाणिस्तानच्या फिरकीचा सामना करावा लागू नये म्हणून तेथील सामनाही हलवण्याची मागणी केली होती.

मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानच्या या नखरेबाजीला केराची टोपली दाखवली आहे. दोघांनीही पाकिस्तानची ही विनंती धुडकावून लावली आहे. 20 जूनला झालेल्या एका बैठकीनंतर आयसीसीने हा निर्णय पीसीबीला कळवला आहे.

World Cup 2023 Pakistan Vs Afghanistan
Crime News : क्लीन बोल्ड करणं जिवावर बेतलं; राग आलेल्या फलंदाजानं 14 वर्षाचा मुलाचा गळाच आवळला

पाकिस्तानमधील माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार पीसीबीने चेन्नईत अफगाणिस्तानविरूद्ध होणारा सामना बंगळुरू आणि बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणारा सामना चेन्नईत हलवण्याची मागणी केली होती. मात्र आता आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला माहिती दिली आहे की यावेळी सामन्यांचे स्थान बदलण्यात येणार नाहीयेत.

ठिकाण कधी बदलू शकतं?

वर्ल्डकपमधील कोणता सामना कोठे खेळायचा हा निर्णय घेण्याचा विशेषाधिकार आयोजक देश म्हणजे बीसीसीआयकडे आहे. अशा प्रकारच्या बदलासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक असते. सामन्याच्या ठिकाणात बदल हा सुरक्षेच्या आधारावरच केला जातो.

याशिवाय जर एखादी जागा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामना आयोजित करण्यासाठी अयोग्य असेल तर सामन्याच्या ठिकाणात बदल करता येतो.

World Cup 2023 Pakistan Vs Afghanistan
ICC Test Ranking Rishabh Pant : सहा महिन्यापासून संघाबाहेर तरी ऋषभ पंत वाचवतोय भारताची लाज

उत्तम सुविधा असलेले चेन्नई आणि बंगळुरू ही ठिकाणे पाकिस्तानसाठी सुरक्षेच्या आधारावर चांगला पर्याय आहेत. पीसीबीचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी अहमदाबादमध्ये भारतासोबत सामना खेळण्यावरून चिंता व्यक्त केली होती.

मात्र या विनंतीवर देखील विचार करण्यात आलेला नाही. यापूर्वी 2016 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाळा येथून कोलकात्याला शिफ्ट करण्यात आला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.