ODI World Cup : कधी नव्हे तर या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच घडलं! स्टेडियममध्ये जाऊन इतक्या लोकांनी पाहिला सामना

ODI World Cup 2023 More Than 10 Lakh People Went To Stadium And Watched Matches
ODI World Cup 2023 More Than 10 Lakh People Went To Stadium And Watched Matchessakal
Updated on

ODI World Cup 2023 : यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतात खेळला जात आहे. हा वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील शेवटचा सामना रविवारी यजमान भारत आणि नेदरलँड यांच्यात बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र याआधी वर्ल्ड मध्ये पहिल्यांदाच एक मोठी गोष्ट घडली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

यापूर्वी 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या यजमानपदी खेळला गेला होता. मात्र यावेळी संपूर्ण स्पर्धेचे यजमानपद भारत एकट्याने घेतले आहे. ही स्पर्धा भारतातील 10 स्टेडियममध्ये खेळवली गेली.

भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपला मिळालेले यश हे प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये 10 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहिले. या वर्ल्ड कपमध्ये अजून सहा सामने बाकी आहेत.

ICC हेड ऑफ इव्हेंट्स ख्रिस टेटली यांनी सांगितले की, या स्पर्धेने आधीच खूप यश मिळवले आहे आणि बाद फेरीचा टप्पा बाकी असताना अनेक विक्रम मोडण्यावर डोळे लागले आहेत. हा वर्ल्ड कप स्टेडियममध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा वर्ल्ड कप बनू शकतो.

बेंगळुरू येथे रविवारी साखळी फेरीतील अंतिम लढतीत भारताची लढत नेदरलँडशी होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होतील.

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी अधिकृतपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर न्यूझीलंड चौथा संघ म्हणून पात्र ठरणे जवळपास निश्चित आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()