ODI World Cup PCB : नाचता येईना अंगण वाकडे! पाकिस्तान चेन्नई, बंगळूर खेळपट्टीवर खेळण्यासाठी घाबरला म्हणे...

पाकिस्तानला बंगळूरमध्ये का वाटते भीती?
pakistan does not want to face afghanistan in chennai in world cup
pakistan does not want to face afghanistan in chennai in world cup
Updated on

ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न खेळण्यासाठी किंवा बीसीसीआयची विनाकारण कोंडी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ विविध कारणे शोधत आहे. चेन्नईतील खेळपट्टी फिरकीस साथ देते, तेथे अफगाणिस्तानशी सामना नको, बंगळूरमध्ये ऑस्ट्रेलिया भारी पडेल म्हणून तेथेही सामना नको, असे तुणतुणे आता सुरू केले आहे.

pakistan does not want to face afghanistan in chennai in world cup
Ashes Series Pat Cummins : दिवसाची सुरूवातच... कर्णधाराने घेतला उस्मान ख्वाजाचा बदला

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याच्या अटीवर बीसीसीआयने पाकचे आशिया करंडक स्पर्धेचे हायब्रिड मॉडेल मान्य केले. या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक लढत १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये खेळण्यासही सुरुवातीस त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली होती, परंतु आशिया करंडक स्पर्धेसाठी बीसीसीआयचा होकार मिळवल्यावर पाक मंडळाने विश्वकरंडक स्पर्धेवरून नाकदुऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे.

नियम काय सांगतो

पाक मंडळाकडून नकारघंटा वाजण्यासाठी अशी कितीही कारणे दिली, तरी बीसीसीआयने आता नियमावर बोट ठेवले आहे. स्पर्धेचा कार्यक्रम जवळपास निश्चित झालेला असताना कोणत्याही ठोस कारणाशिवाय ठिकाणावर आक्षेप घेता येत नसतो, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

सुरक्षिततेच्या कारणावरून ठिकाणांत बदल करण्यात येत असतो, २०१६ मध्ये भारतात झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाककडून ठराविक धरमशाला या ठिकाणाबाबत सुरक्षेवरून आक्षेप घेण्यात आला होता, परंतु संघाची ताकद आणि उणिवा यावरून ठिकाणे बदलली जात नसतात, असेही बीसीसीआयच्या सदस्याने सांगितले.

pakistan does not want to face afghanistan in chennai in world cup
Team India : BCCIनं जडेजाला बसवलं विराट, रोहितच्या पंक्तीत; दाखवला बाहेरचा रस्ता?

राशीद खान, नूर अहमदची भीती

दुबई असो वा स्वतःच्या मायदेशात असो फिरकी गोलंदाजीचा उत्तमपणे सामना करणाऱ्या पाकिस्तानला भीती अफगाणिस्तानच्या राशीद खान आणि नूर अहमद यांची वाटत आहे. या आयपीएलमध्ये अहमदाबाद संघातून खेळणाऱ्या या दोघांनी चमकदार कामगिरी केली होती. त्याची धास्ती पाकला वाटू लागली आहे.

pakistan does not want to face afghanistan in chennai in world cup
Bhavani Devi Fencing : कोणालाही जमलं नाही ते भवानी देवीनं करून दाखवलं; चीनमध्ये फडकवला भारताचा झेंडा

बंगळूरचे कारण काय?

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीस एकमदच उपयुक्त असते. मग अशा ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा सामना टाळण्याचे कारण आणि त्याचे स्पष्टीकरण पाक मंडळ देऊ शकले नाही. अफगाणिस्ताविरुद्धचा सामना बंगळूरमध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईत अशी अदलाबदल करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

अहमदाबादमध्ये खेळणार का?

अहमदाबादमधील नियोजित भारत-पाक सामन्यात खेळणार का, या प्रश्नावर पाक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले, की या ठिकाणी खेळण्याबाबत तसा आक्षेप नसेल; मात्र आमच्या सरकारकडून अंतिम मंजुरी महत्त्वाची आहे. पाकचे साखळी सामने चेन्नई, कोलकता, बंगळूर आणि हैदराबाद येथे प्रस्तावित आहेत. स्पर्धा सुरू होण्याअगोदर पाकचे दोन सराव सामने हैदराबादमध्ये ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी नियोजित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.