FIFA Women’s World Cup : मुलीने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला अन् वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

FIFA Women’s World Cup
FIFA Women’s World Cup
Updated on

FIFA Women’s World Cup Olga Carmona father's death : स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने रविवारी देदीप्यमान कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडवर १-० असा विजय मिळवत पहिल्यांदाच महिला विश्‍वकरंडक फुटबॉल या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. ओल्गा कॅरमोना हिने २९व्या मिनिटाला गोल करीत स्पेनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पण तिला सामन्यानंतर कळले की तिचे वडील आता या जगात नाहीत. स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने सोमवारी सांगितले की, कार्मोनाचे वडील आजारी होते आणि अखेरचा श्वास घेतला आहे. मृत्यूच्या कारणांची सविस्तर माहिती संघाने दिली नाही.

वडिलांचे निधन झाल्यानंतर कार्मोनाने ट्विटर वर लिहिले की, “खेळ सुरू होण्यापूर्वी माझ्यासोबत माझा स्टार होता. मला माहित आहे की तुम्ही मला काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी सक्षम केले आहे. मला माहित आहे की आज रात्री तू मला पाहत आहेस आणि तुला माझा अभिमान आहे. तुमच्या आत्म्याला शांती लाभो बाबा.

FIFA Women’s World Cup
Harmanpreet Kaur : 'मला त्या कृत्याबद्दल पश्चात्ताप...' बांगलादेशविरुद्धच्या रागावर कर्णधारने सोडले मौन

स्पेन - इंग्लंड यांच्यामधील अंतिम लढत सिडनी येथील फुटबॉल स्टेडियममध्ये पार पडली. या लढतीला फुटबॉलप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. या लढतीला ७५ हजार ७८४ प्रेक्षकांची उपस्थिती होती. स्पेनची कर्णधार ओल्गा कॅरमोना हिने पूर्वार्धात गोल करीत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र दोन्ही देशांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे ओल्गा हिचा गोलच निर्णायक ठरला. स्पेनच्या संघाने विश्‍वकरंडकातील तिसऱ्याच प्रयत्नात विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला, ही वाखाणण्याजोगी बाब.

इंग्लंडच्या संघाने या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवला. मागील ३९ लढतींमधील हा त्यांचा दुसराच पराभव ठरला. मागील वर्षी इंग्लंडने जर्मनीला नमवत युरो स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे विश्‍वकरंडकाच्या अजिंक्यपदासाठीही त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात होते. इंग्लंडच्या महिला संघाने या स्पर्धेच्या साखळी फेरीत तिन्ही लढतींमध्ये विजय मिळवून शानदार सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.