Paris Olympic 2024 पदक विजेत्या Manu Bhaker चा रॅम्प वॉक

Paris olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये मनू भाकरने इतिहास रचला आहे.
Manu Bhaker
Manu Bhakeresakal
Updated on

Manu Bhaker Ramp Walk: ऑलिम्पिक चॅम्पियन मनू भाकरने नुकतेच लॅक्मे फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले आणि तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाकरने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १०-मीटर एअर पिस्तूल आणि १०-मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक मिळवून ऑलिम्पिकच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय ऍथलीट बनून इतिहास रचला.

मनू भाकरचा फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक

मनू भाकर रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये मनू भाकर फॅशनेबल कपडे परिधान करून रॅम्प वॉक करताना पहायला मिळत आहे. मनूच्या ह्या रॅम्प वॉकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मनू भाकर एक यशस्वी नेमबाजी आहे, तिने आएसएसएफ (ISSF) जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप, आएसएसएफ वर्ल्ड कप, आशियाई चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनेक पदके जिंकली आहेत. तिने २०२२ आशियाई खेळ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे प्रसिद्धी मिळवली आहे.

पॅरिसमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर मनू भाकरने सध्या खेळातून विश्रांती घेतली आहे. आगामी स्पर्धांची तयारी सुरू करण्यापूर्वी ती काही महिने शूटिंगपासून दूर राहणार असल्याचे तिने सांगितले.

Manu Bhaker
Rafael Nadal announces retirement : 'लाल'मातीवरील बादशाह राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर

अलीकडेच मनू भाकरला तिच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल लेडी श्री राम महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाने तिच्या जिवनप्रवास उलघडला. तिची प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि क्रीडा चाहते जमले होते. मनूने या प्रवासादरम्या झेललेली आव्हाने आणि खेळात यशस्वी होण्यासाठी तिने केलेल्या कठोर परिश्रमांविषयी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.