'स्वप्न पूर्ण झाले'; नीरजकडून गोल्ड मेडल मिल्खा सिंग यांना समर्पित

Neeraj Chopra
Neeraj Chopra
Updated on
Summary

ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आपले मेडल मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे. जून महिन्यात मिल्खा सिंग यांचे कोरोना विषाणूची बाधा झाल्याने निधन झाले होते.

नवी दिल्ली- ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आपले मेडल मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे. जून महिन्यात मिल्खा सिंग यांचे कोरोना विषाणूची बाधा झाल्याने निधन झाले होते. नीरजकडून मिळालेल्या या सन्मानानंतर मिल्खा सिंग यांचे पुत्र आणि स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंह भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मनापासून नीरजचे आभार व्यक्त केले आहे. (Olympic games tokyo 2020)

भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज म्हणाला की, मिल्खा सिंग स्टेडियममध्ये राष्ट्रगीत ऐकू इच्छित होते. ते आता या जगात नाहीत पण त्यांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. जीव यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की, 'वडील अनेक वर्षांपासून याची वाट पाहात होते. अॅथलेटिक्समधील गोल्ड मेडलनंतर त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. ट्विट करताना मला अश्रू अनावर होत आहेत. मला विश्वास आहे की स्वर्गात वडिलांच्या डोळ्यातही पाणी आले असेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे आभार.'

Neeraj Chopra
सोनियाचा दिनु...!

जीव पुढे म्हणाले की, तुम्ही ऑलिम्पिक खेळांमध्ये अॅथलेटिक्समध्ये पहिले गोल्ड मेडल जिंकले. तुम्ही हे माझ्या वडिलांना समर्पित केले. मिल्खा परिवार या सन्मानासाठी आभार व्यक्त करते. गोल्ड जिंकल्यानंतर नीरज म्हणाला की, 'देश आणि माझ्यासाठी हा गौरवशाली क्षण आहे. विश्वास होत नाहीये. पहिली वेळ आहे की भारताला अॅथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळत आहे. मी खूप आनंदी हे.'

Neeraj Chopra
विरोधी ऐक्याचा नवा डाव ...

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे वैयक्तिक गोल्ड मिळवून दिलय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()