अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू विरधवल खाडे ( Virdhawal Khade) याच्यावर ग्रेटर मुंबई हौशी जलतरण संघटनेने ( GMAAA) एका वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे. GMAAA च्या सचिव स्नेहल भाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विरधवल याच्यावर प्रशिक्षण घेत असलेल्या १८ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तवणुक केल्याचा आरोप ठेवला गेला आहे. मुंबई उपनगरातील एका नामांकित जिमखान्यात विरधवल या मुलीला मागील दोन वर्षांपासून प्रशिक्षण देत होता. विरधवलने या मुलीला काही अश्लील छायाचित्रे पाठवल्याचा आरोप आहे. मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर संघटनेने ही कारवाई केली आहे. याबाबत 'सकाळ डिजिटल'ने विरधवलशी संपर्क साधला असता त्याने कॉल उचलला नाही.