टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जपानच्या NISHIYA Momiji हिने वयाच्या 13 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवलीये. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या स्केटबोर्डींग इवेंटमध्ये सुवर्ण पदक पटकवणारी कमाई करणारी ती पहिली खेळाडू ठरलीये. महिला गटातील स्ट्रीट फायनलमध्ये तिने ब्राझीलच्या 13 वर्षीय Rayssa Leal (रौप्य) आणि आपल्याच देशातील 16 वर्षीय NAKAYAMA Funa (कांस्य) मागे टाकत गोल्ड मेडल मिळवले. तिचे वय 13 वर्षे आणि 330 दिवस इतके आहे.
या स्पर्धेत सर्वात कमी वयाच्या Nishiya आणि Leal या दोघींनी कमालीची कामगिरी करुन दाखवली. स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोघींमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. अंतिम फेरीपूर्वी Leal च्या खात्यात 14.64 गुण होते तर Nishiya ने 14.74 गुण मिळवले होते. पाचव्या टप्पात Leal अपयशी ठरली. त्यानंतर जपानच्या 13 वर्षीय खेळाडूने या खेळ प्रकारातील पहिले वहिले सुवर्ण पटकवण्याचा पराक्रम आपल्या नावे केला.
ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वात कमी वयात गोल्ड मेडल जिंकण्याचा पराक्रम अमेरिकेच्या Marjorie Gestring हिच्या नावे आहे. तिने 13 वर्षे 268 दिवस एवढ्या वयात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये 3 मीटर स्पिंगबोर्ड ड्राइव्हिंग क्रीडा प्रकारात या विक्रमाची नोंद झाली होती. हा विक्रम आबाधितच राहिलाय. स्किट बोर्डिंगमध्ये रौप्य पदक विजेती ब्राझिलीयन Rayssa Leal 13 वर्षे 203 दिवस इतक्या वयाची आहे. जर तिला सुवर्ण मिळाले असते तर बर्लिन ऑलिम्पिकमधील रेकॉर्ड ब्रेक झाला असता. रौप्य पदकासह ती सर्वात कमी वयाची ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.