ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली सुपर मॉम मोठ्या कात्रीत साडपलीये. लेकीला दूध पाजायचे की ऑलिम्पिक स्पर्धेत खेळायचे? यातील एक काहीतरी निवडण्याची वेळ कॅनडाची बास्केटबॉल खेळाडू किम गौचर हिच्यावर आलीये. आपल्या तीन महिन्यांच्या लेकीला स्तनपान करण्यासाठी नियमातून सूट मिळावी, यासाठी तिने ऑलिम्पिक आयोजकांकडे विनंती केली होती. पण आयोजकांनी तिची विनंती नाकारली आहे. स्पर्धेदरम्यान मित्र, कुटुंबियातील सदस्य आणि अपवादात्मक परिस्थितीचा विचार केला जाणार नाही, असा रिप्लाय तिला आयोजकांकडून देण्यात आला. (Olympics Canadias Kim Gaucher Reject Exemption Request for Breastfeeding Children)
कॅनडाची बास्केटबॉल महिला खेळाडू किम गौचर (Kim Gaucher) हिने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून कठोर निर्णयाचा पेच समोर उभा असल्याचे सांगितले. लेकीला स्तनपान करायचे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा यापैकी एकाची निवड तिला करायची आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होताना कठोर नियमांचे पालन करावे लागत आहे. नियमावलीचे पालन करत असताना मार्चमध्ये जन्मलेल्या सोफीला टोकियो ऑलिम्पिकवेळी सोबत नेता येणार नाही, असे किमने एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान टोकियोत ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा मागील वर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत नियोजित होती. कोरोनाच्या संकटामुळे जगातील मानाची स्पर्धा वर्षांनी पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर ओढावली होती.
किमने व्हिडिओमध्ये म्हटलंय की, स्पर्धेत सहभागी होताना लेकीच्या स्तनपानाचा मुद्दा उपस्थितीत करत नियमातून सूट मिळावी, अशी विनंती केली होती. पण याला आयोजकांनी नकार दिलाय. सध्याच्या घडीला कोणीही काहीच करु शकत नाही. 37 वर्षीय किम आपल्या लेकीला अंगावरील दूध पाठवता येईल का? याचाही विचार करत आहे . जे नियम आहेत त्यातून हे देखील सहज शक्य होईल असे वाटत नाही. सध्याच्या घडीला मला स्तनपान करणारी आई आणि ऑलिम्पिकमध्ये खेळणारी खेळाडू यापैकी एक भूमिका निवडायची आहे. जपानमध्ये सामन्यावेळी मर्यादित क्षमतेत स्थानिक प्रेक्षक असताना लेकीच्यात आणि माझ्यात मोठे अंतर असेल, अशी भावनाही किमने व्यक्त केलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.