ओमानच्या कर्णधाराची कमाल; पहिल्याच लढतीत विक्रमी 'चौका'

ओमानचा कर्णधार झीशान मकसूदनं 16 व्या षटकात एक धाव खर्च करून या एकाच षटकात तीन फलंदाजांना तंबूत धाडले.
Zeeshan Maqsood
Zeeshan Maqsood ICC Twitter
Updated on

Oman vs Papua New Guinea, 1st Match, Group B : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ओमानच्या कर्णधाराने विक्रमी कामगिरी करुन दाखवली. घरच्या मैदानावर पापुआ न्यू गिनी विरुद्धच्या क्वॉलिफायर लढतीत नाणेफेक जिंकून ओमान कर्णधार झीशान मकसूद (Zeeshan Maqsood) याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन षटकातच ओमानच्या कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पापुआ न्यू गिनीला सुरुवातीच्या दोन षटकात दोन धक्के बसले. यावेळी त्यांच्या धावफलकावर एकही धाव नव्हती.

Zeeshan Maqsood
संघाला शून्यातून सावरलं; टी-20 वर्ल्ड कपमधील पहिली फिफ्टी!

पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वला आणि चार्ल्स अमीनी या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागादीरी करुन संघाचा डाव सावरला. पण ही जोडी माघारी फिरल्यानंतर पापुआ न्यू गिनीला ठराविक अंतराने धक्क्यावर धक्के बसत राहिले. ओमानचा कर्णधार झीशान मकसूदनं 16 व्या षटकात एक धाव खर्च करून या एकाच षटकात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. 18 व्या षटकात त्याने सामन्यातील चौथी विकेट घेतली.

Zeeshan Maqsood
T20 WC 2021 - शेड्युल, नवे नियम ते विजेत्याला किती रक्कम मिळणार? वाचा एका क्लिकवर

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एका डावात चार विकेट घेणारा तो दुसरा कर्णधार ठरलाय. यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार डेनियल विटोरी याने अशी कामगिरी केली होती. 2007 मध्ये रंगलेल्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचे नेतृत्व करताना विटोरीने भारताविरुद्धच्या सामन्यात 20 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ओमनच्या कर्णधाराने 20 धावांत 4 विकेट घेत खास विक्रम आपल्या नावे केला.

पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वला 56, चार्ल्स अमीनी 37 आणि सेसे बाऊ 13 धावा वगळता अन्य कोणत्याही दुहेरी आकडा पार करता आला नाही. परिणामी ओमानच्या गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनी संघाला निर्धारित 20 षटकात 9 बाद 129 धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.