Rishabh Pant : ऋषभ पंतबाबत दिल्ली कॅपिटल्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; बीसीसीआय सोबत...

Rishabh Pant Captaincy Delhi Capitals
Rishabh Pant Captaincy Delhi Capitals esakal
Updated on

Rishabh Pant Captaincy Delhi Capitals : आयपीएल 2023 चा हंगाम आता जवळ आला असून सर्व फ्रेंचायजी तयारीला लागले आहेत. मात्र यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला अन् त्यात तो जबर जखमी झाला. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याचे लिगामेंट टिअर झाले आहेत. या दुखापतीतून सावरण्यासाठी पंतला वेळ लागू शकतो. त्यामुळे त्याच्या आयपीएल सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Rishabh Pant Captaincy Delhi Capitals
Ranji Trophy : मुंबईला कोणी वाली आहे की नाही; सर्फराजनं अजून किती शतकं ठोकायची?

ऋषभ पंतच्या दुखपातीतून सावरण्यावर बीसीसीआय बारीक लक्ष ठेवून आहे. याबाबत आता दिल्ली कॅपिटल्स देखील बीसीसीआय, सल्लागार सौरव गांगुली आणि प्रशिक्षक रिकी पॉटिंगशी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने सौरव गांगुलीची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तो आता क्रिकेट संदर्भातील सर्व गोष्टी सांभाळणार आहे. त्यामुळे गांगुली आणि रिकी पॉटिंगला पंतच्या अपघातानंतर दिल्ली कॅपिटल्सचा भविष्यातील कर्णधार कोण असेल हे निश्चित करावे लागेल.

ऋषभ पंतला नुकतेच अतिदक्षता विभागातून खासगी रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. पंतच्या शरिरावर अनेक ठिकाणी सूज आली आहे. ती अजूनही कमी आलेली नाही. पंतला अजून चालता येत नाहीये. ऋषभ पंत अजून एमआरआय स्कॅन करण्याइतपतही बरा झालेला नाही.

(Sports Latest News)

Rishabh Pant Captaincy Delhi Capitals
IPL Mandira Bedi : मंदिरा बेदी परतणार! गुणवान खेळाडूंना 'क्रिकेट का तिकीट' देणार

पंतच्या रिकव्हरीबाबत डॉक्टर आणि बीसीसीआय एकमेकांशी सल्लामसलत करत आहेत. यानंतरच ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात हलवण्यात येणार आहे. तेथे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येण्याची शक्यता आहे. पंतच्या गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली आहे.

त्यामुळे या दोन्हीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता देखील आहे. याबाबतच दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन बीसीसीआयशी पंतच्या रिकव्हरीबाबत चर्चा करणार आहे. यानंतरच दिल्लीचा पुढचा कॅप्टन कोण होईल हे ठरवले जाईल.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.