On This Day Anil Kumble 10 Wickets India vs Pakistan Test : भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटर्समध्ये अनिल कुंबळे यांच्या नावाचाही समावेश आहे. या फिरकीपटूनं पाकिस्तानचा अख्खा संघ गारद करुन विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. बीसीसीआयनं अनिल कुंबळेंच्या या विक्रमी कामगिरीला उजाळा दिला आहे. 7 फेब्रुवारी 1999 हा दिवस भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय असा होता. या दिवशी अनिल कुंबळे यांनी कसोटीतील एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला होता.
1999 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारत-पाक द्विपक्षीय मालिकेतील दुसरा कसोटी सामना 4 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीतील फिरोजशहा कोटला (सध्याचे अरुण जेटली स्टेडियम) च्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियानं पहिल्या डावात सर्वबाद 252 धावा केल्या. पाकिस्तान संघाचा पहिला डाव अवघ्या 172 धावांत आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 339 धावांचा डोंगर रचत पाकिस्तानसमोर तगडे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना एकट्या कुंबळेंनी पाकिस्तानच्या संघाचा धुव्वा उडवला होता. पहिल्या डावात 4 विकेट्स घेणाऱ्या कुबळेंनी दुसऱ्या डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. कुंबळेंनी एजाज अहमद, मोहम्मद यूसुफ आणि सकलेन मुस्ताक यांना खातेही उघडू दिले नव्हते.
अनिल कुंबळेंनी या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात 26.3 षटकात 74 धावा देत 10 विकेट्स घेतल्या होत्या. या डावात त्यांनी 9 षटकं निर्धाव टाकली. कुबळेंच्या जम्बो विक्रमासह भारतीय संघाने हा सामना 212 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला होता. अनिल कुंबळे यांनी 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 619 विकेट्स घेतल्या. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत तीन गोलंदाजांनी असा पराक्रम करुन दाखवला आहे.
सर्वात आधी हा विक्रम इंग्लंड गोलंदाज J C Laker यांच्या नावे होता. 1956 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सान्यात लॅकर यांनी 51.2 षटकात 53 धावा खर्च करुन 10 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंड फिरकीपटू एजाज पटेल याने भारताविरुद्ध 10 विकेट्स घेत कुबळे आणि लॅकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.