On This Day : 29 वर्षापूर्वी वॉर्नने टाकलेला तो चेंडू ठरला 'बॉल ऑफ द सेंचुरी'

4 जून 1993... हा दिवस शेन वॉर्नसाठी खास असाच होता. क्रिकेटच्या मैदानातील एका चेंडूनं भल्याभल्यांना चक्रावून सोडलं होत.
On This Day In 1993 Shane Warne
On This Day In 1993 Shane Warne
Updated on

On This Day In 1993 Shane Warne: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जेव्हा जेव्हा जगातील महान स्पिनरची चर्चा होते तेव्हा ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचे नाव अग्रसर असते. शेन वॉर्नने या जगाचा निरोप घेतला असला तरी त्याचे क्रिकेटमधील योगदान सदैव अमर राहील. शेन वॉर्नच्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रमांमुळे आणि त्याच्या वादांमुळे चर्चेत राहिली आहे. असाच एक दिवस 4 जून क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे.

29 वर्षांपूर्वी याच दिवशी 4 जून 1993 रोजी ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लेगस्पिनर शेन वॉर्नने 'बॉल ऑफ द सेंच्युरी' (Shane Warne Ball of the Century) असा चेंडू टाकला होता. शेन वॉर्नने टाकलेल्या तो चेंडू चमत्कारीक असाच होता. त्याने हा चेंडू जवळपास 90 अंशात वळवला होता. अॅशेस मालिकेदरम्यान मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत त्याने हा करिष्मा केला होता. अॅशेस मालिकेतील हा वॉर्नचा पहिला चेंडू होता, ज्यावर त्याने इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगला बाद केले. या चेंडूमुळे शेन वॉर्न रातोरात स्टार झाला होता.

1993 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ अॅशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. मालिकेतील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात होता. पहिला कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 5 बाद 242 धावा केल्या होत्या, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 289 धावांवर ऑल आऊट झाला. 4 जून रोजी ऑस्ट्रेलियन संघासाठी शेन वॉर्न त्याच्या कारकिर्दीतील पहिला अॅशेस कसोटी सामना खेळत होता. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी डावाला सुरुवात केली. सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मैदानात माइक गॅटिंग उतरला, त्यांनी खणखणीत चौकार खेचून खाते उघडले.

गेटिंग आणि ग्राहम गूच जोडी फोडण्यासाठी तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार एलेन बॉर्डरने शेन वॉर्नच्या हाती चेंडू सोपवला. शेन वॉर्ननं आपला चमत्कार दाखवून दिला. वॉर्नने पहिल्याच चेंडूवर माइक गेटिंग यांची ऑफ स्टम्प उडवली. हा लेग स्पिन बॉल होता जो लेग स्टंपच्या बाहेर आदळल्यानंतर गॅटिंगच्या ऑफ-स्टंपकडे गेला. वॉर्नने पहिल्याच चेंडूवर माइक गेटिंग यांची ऑफ स्टम्प उडवला. त्याच्या या जादुई चेंडूवर माईक गॅटिंग दंग झाला होता, चेंडू ९० अंश फिरला होता. हा चेंडू पाहणाऱ्या प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाला. या चेंडूला शतकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.