On This Day: 2018 ला कांगरूंचीच शिकार करत टीम इंडियाने रचला होता इतिहास

On This Day In 2018 India U19 Team Beat Australia U19 Team and Won Record 4th ICC U19 World Cup
On This Day In 2018 India U19 Team Beat Australia U19 Team and Won Record 4th ICC U19 World Cup esakal
Updated on

On This Day : वेस्ट इंडीजसमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत (ICC U19 World Cup 2022) भारताने ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करत फायनल गाठली. बरोबर 3 वर्षापूर्वी भारताच्या 19 वर्षाच्या संघानेच (India U19) ऑस्ट्रेलियाचा (Australia U19) पराभव करत इतिहास रचला होता. भारताने 3 फेब्रुवारी 2018 ला 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या (ICC U19 World Cup Final) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चौथ्यांदा वर्ल्डकप उंचावण्याचा विश्वविक्रम केला होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ज्यावेळी ऑस्ट्रेलियाला (Australian Men’s Cricket Team) पराभूत करत फायनल गाठली त्यावेळी भारतात 3 फेब्रुवारी उजाडला होता. त्यामुळे विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.

On This Day In 2018 India U19 Team Beat Australia U19 Team and Won Record 4th ICC U19 World Cup
U19 WC 2022 : कांगारुंची शिकार; युवा टीम इंडिया फायनलमध्ये

2018 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये (ICC U19 World Cup 2018) भारताच्या 19 वर्षाखालील संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेतील सहा च्या सहा सामने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. 2018 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने सेमी फायनलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 203 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर भारताने फानलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

On This Day In 2018 India U19 Team Beat Australia U19 Team and Won Record 4th ICC U19 World Cup
U 19 WC 2022 : यश धूलचं विक्रमी शतक; कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 217 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने सलामीवीर मनोज कालराच्या (Manjot Kalra) नाबाद शतकी (101) खेळीच्या जोरावर पार केले. त्याला विकेटकिपर हार्विक देसाईने 47 धावांची नाबाद खेळी करत चांगली साथ दिली होती. भारताने ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे आव्हान 38.5 षटकातच पार केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.