Virat Kohli Birthday : किंग कोहलीच्या वाढदिवसाआधीच हा काय ट्रेंड सुरू झालाय?

Virat Kohli Birthday
Virat Kohli Birthdayesakal
Updated on

King Kohli Birthday CDP : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आशिया कपपासूनच फलंदाजीत जबरदस्त लय पकडली आहे. त्याचा धावांचा ओघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील सुरूच असून त्याने आतापर्यंत चार सामन्यात तीन अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान, उद्या 5 नोव्हेंबरला किंग कोहली आपला 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे. मात्र त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एक दिवस आधीच सुरू झाले आहे. जगभरातील त्याचे चाहते त्याला एक भन्नाट गिफ्ट देण्याचे प्लॅनिंग करत आहेत. त्यामुळे ट्विटवर विराट कोहली संदर्भात एक वेगळाच हॅशटॅग ट्रेंग करताना दिसतोय.

Virat Kohli Birthday
NZ Vs IRE : न्यूझीलंडने सेमी फायनल गाठली! ऑस्ट्रेलियावर धावगती वाढवण्याचा दबाव

विराट कोहली फक्त भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचे फॅन्स जगभरात विखुरले आहेत. सोशल मीडियावर देखील विराट कोहलीची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावरील फॅन फॉलोईंगमध्ये जगातील कोणाताच क्रिकेटर विराटच्या जवळपास नाहीये. आता याच विराटच्या जबऱ्या फॅन्सनी विराटचा वाढदिवस जवळ आल्यानंतर ट्विटरवर एक ट्रेंड सुरू केला. #KingKohliBirthdayCDP हा हॅशटॅग सध्या सोशला मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. या हॅशटॅगनुसार विराटच्या चाहत्यांच्या डीपीवर एकसारखाच फोटो असला पाहिजे. या हॅशटॅगमधील CDP म्हणजे Common DP सर्वांचा एकसारखाच प्रोफाईल फोटो.

Virat Kohli Birthday
भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

भारताने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये चार सामने खेळले आहेत. त्यातील दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना सोडला तर भारताने आपले सर्व सामने जिंकून गुणतालिकेत 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले आहे. आता भारताचा शेवटचा सामना रविवारी झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. विराटने या चार सामन्यापैकी तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. पाकिस्तानविरूद्ध नाबाद 82 धावांची खेळी करून त्याने भारताला गमावलेला सामना जिंकून दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()