PAK vs IND Playing 11: राहुलने वाढवले टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कोण होणार बाहेर? जाणून घ्या टीम इंडिया प्लेइंग-11

PAK vs IND Playing 11
PAK vs IND Playing 11sakal
Updated on

Pakistan Vs India Playing XI Asia Cup 2023 : आशिया कपच्या सुपर-4 फेरीत रविवारी भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात उतरण्यापूर्वी टीम इंडियाला आपल्या प्लेइंग-11बद्दल खूप विचार करावा लागणार आहे. कारण मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज केएल राहुल दुखापतीनंतर परतला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दुसरीकडे नेपाळविरुद्ध न खेळलेला जसप्रीत बुमराहही या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

PAK vs IND Playing 11
Aus vs Sa ODI :ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेत रचला इतिहास! वॉर्नर अन् हेड यांनी तुफानी फलंदाजी करत केला मोठा विक्रम

दुखापतीमुळे राहुल बराच काळ संघातून बाहेर होता. आशिया कपमध्ये संघाच्या पहिल्या दोन सामन्यातही खेळू शकला नाही. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. कोलंबोतील इनडोअर स्टेडियममध्ये त्याने सराव सुधा केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. हा आत्मविश्वास पाहता पाकिस्तानविरुद्ध केएल राहुलचे पुनरागमन होऊ शकते, असे मानले जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की राहुल आला तर कोण बाहेर जाणार?

PAK vs IND Playing 11
Asia Cup: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा, २१ धावांनी केला पराभव

राहुलच्या जागी इशान किशन पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळला होता. इशानने पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची शानदार खेळी खेळली. पण त्याला नेपाळविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नाही. आता एवढ्या शानदार खेळीनंतर तो संघातून बाहेर जातो की राहुलसाठी आणखी कोणाला बाहेर जावे लागेल.

गेल्या महिनाभरात इशानने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया कप आधी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन शतके आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले आहे.

दुसरीकडे राहुल यांच्याकडेही दुर्लक्ष करणे कठीण आहे. संघ व्यवस्थापन सुरुवातीपासूनच त्याच्या फिटनेसची वाट पाहत होते. आता तो तंदुरुस्त असून संघात परतला आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलने 18 सामन्यात 53 च्या सरासरीने 742 धावा केल्या आहेत. त्याने पाचव्या क्रमांकावर एक शतक आणि सात अर्धशतकेही केली आहेत. त्याचे यष्टिरक्षणही चांगले आहे आणि या स्पर्धेत संघात आल्यानंतर त्याने यष्टीरक्षणाचा सरावही केला होता.

PAK vs IND Playing 11
IND vs PAK: 'माझ्यावर इतरांपेक्षा तिप्पट ओझे...', भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी उपकर्णधारने केले मोठे वक्तव्य

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश झाला असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाची गोलंदाजीही मजबूत झाली आहे. गटाच्या सामन्यात बुमराहचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पावसामुळे संघाने गोलंदाजी केली नाही. त्यानंतर नेपाळविरुद्ध वैयक्तिक कारणांमुळे त्याला मायदेशी परतावे लागले. नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळाली. बुमराहसह सिराज प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. शमीला बाहेर बसावे लागू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()