PAK vs WI: वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) कमाल केली. या सामन्यात त्याने 52 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. टी-20 मधील त्याचे हे 11 वे अर्धशतक आहे. रिझवान आणि हैदर अलीच्या (Haidar Ali) स्फोटक खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 200 धावा केल्या होत्या. रिझवानशिवाय हैदर अलीने 39 चेंडूत 68 धावांची धमाकेदार खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) सामन्यात खातेही उघडता आले नाही. पाकने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ 137 धावांत आटोपला.
रिझवानने पार केला 1500 धावांचा टप्पा
अर्धशतकी खेळी करुन संघाच्या डावाला दमदार सुरुवात करुन देणाऱ्या रिझवानेन आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1500 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा पाकिस्तानी फलंदाज आहे. रिझवानपूर्वी बाबर आझम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक आणि उमर मलिक यांनी हा पल्ला गाठला होता.
ख्रिस गेलचा विक्रम मोडला
मोहम्मद रिझवानने 1500 धावांचा पल्ला पार करत कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. रिझवानने अवघ्या 42 डावात ही कामगिरी करुन दाखवली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 1500 धावा करण्यासाठी गेलने 44 वेळा बॅटिंग केली होती. सर्वात जलद 1500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये बाबर आझम, विराट कोहली, एरॉन फिंच आणि केएल राहुल या खेळाडूंचा नंबर लागतो. या चौघांनी 39 डावातच 1500 धावा पूर्ण केल्या होत्या.
यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा
पाकिस्तानचा सलामीवीर रिझवानने पहिल्या 17 डावात केवळ 224 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर तो कमालीची कामगिरी करताना पाहयला मिळआले. यंदाच्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने करुन दाखवला. यावर्षात त्याने 1200 हून अधिक धावा आपल्या नावे केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.