Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा...नीरज चोप्राचे सुवर्ण हुकलं, पण आईने दिली मनं जिंकणारी प्रतिक्रिया

Neeraj Chopra mother Saroj Devi Reaction: नीरज चोप्राला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण, पाकिस्तानच्या अरशद नदीमने त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. अरशद नदीमने विक्रमी ९२.९७ मीटर थ्रो करून विक्रम केला आहे.
Arshad Nadeem Neeraj Chopra
Arshad Nadeem Neeraj Chopra
Updated on

नवी दिल्ली- भारताचा स्टार जेवलिन थ्रोअर नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. चोप्राने रौप्य पदक जिंकलं आहे. सलग दोन पदकं जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण, पाकिस्तानच्या अरशद नदीमने त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. अरशद नदीमने विक्रमी ९२.९७ मीटर थ्रो करून विक्रम केला आहे.

नीरज याच्या यशानंतर त्याची आई सरोज देवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सरोज देवी म्हणाल्यात की सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. त्यांनी अरशद नदीम याचे तोंडभरून कौतुक केलं. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे. त्याने पण खूप कष्ट घेतले होते, असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.

Arshad Nadeem Neeraj Chopra
Neeraj Chopra: नीरज चोप्राच्या हातून 'गोल्ड' केव्हा निसटले? Explainer जो सर्व प्रश्नांची उत्तर देईल

सरोज देवी म्हणाल्या की, 'आज आनंदाचा दिवस आहे. आमच्यासाठी रौप्य पदक सुवर्ण पदकासारखाच आहे. सुवर्ण पदक अरशद नदीमला मिळाले. तो देखील आमचाच मुलगा आहे. त्याने खूप कष्ट घेतले होते. मी नीरजने केलेल्या कामगिरीवर समाधानी आहे. नीरज जेव्हा घरी येईल तेव्हा त्याचे आवडीचे जेवण करेन.' माहितीनुसार, नीरज आणि नदीम हे चांगले मित्र आहेत.

Arshad Nadeem Neeraj Chopra
Neeraj Chopra Olympic 2024: हक्काचे 'सुवर्ण' ही गेले! नीरज चोप्राचे स्वप्न पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तोडले

२६ वर्षीय नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटरचा थ्रो केला अन् रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. त्याचा दुसरा थ्रोच वैध धरण्यात आला होता. त्याचे इतर पाच प्रयत्न ग्रहित धरण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे, नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर थ्रो करून सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यामुळे यावेळी त्याची कामगिरी चमकदार होती.

पाकिस्तानच्या नदीमने ९२.९७ मीटरचा विक्रमी थ्रो केला. हा नवा ऑलिम्पिक रिकॉर्ड आहे. त्याने थॉर्किल्डसेन एंड्रियास याचा १६ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. नॉर्वेच्या एंड्रियास याने २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटरचा थ्रो केला होता. यावेळी नदीम सर्वांवर भारी पडला. याआधी नीरजने दहा स्पर्धांमध्ये नदीमला हरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.