Pakistan No 1 ODI Ranking PAK vs AFG 3rd ODI : तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 59 धावांनी पराभव करून मालिका 3-0 ने जिंकली. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानसमोर पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही.
आयसीसी वनडे क्रमवारीत अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा फायदा पाकिस्तानला झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ वनडेत नंबर वन बनला आहे. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. भारतीय संघ 113 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
आशिया कप 2023 पूर्वी पाकिस्तानसाठी ही मोठी उपलब्धी आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आल्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास सातव्या गगनाला भिडला आहे. पाकिस्तानने या वर्षात आतापर्यंत 11 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 8 जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर त्याने मालिका 1-2 ने गमावली, त्यानंतर बाबरच्या सैन्याने किवीजचा 4-1 असा पराभव केला. पाकिस्तान टी-20 क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर कसोटी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा संघ 118.48 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ 118 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ 115.8 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.