Pakistan Bomb Blast PSL : बॉम्ब ब्लास्ट झाला अन् बाबर आझम, शाहिद आफ्रिदीची झाली पळापळ

Pakistan Bomb Blast During PSL
Pakistan Bomb Blast During PSL esakal
Updated on

Pakistan Bomb Blast During PSL : पाकिस्तानचे सर्व स्टार क्रिकेटपटू सध्या पाकिस्तान सुपर लीग खेळत आहे. मात्र आज रविवारी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होत असलेल्या नवाब अकबर बुगटी स्टेडियमजवळ बॉम्ब ब्लास्ट झाला. या ब्लास्टचा परिणाम सामन्यावरही झाला. हल्ला झाल्या झाल्या सामन्यातील स्टार खेळाडूंना त्वरित पॅव्हेलियनमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

Pakistan Bomb Blast During PSL
Ravichandran Ashwin : ऑस्ट्रेलिया विराट, रोहितला नाही तर अश्विनलाच घाबरण्याची 3 कारणे

नवाब अकबर बुगटी स्टेडियमजवळ स्टेडियमच्या जवळ असलेल्या पोलीस लाईन भागात आतंकवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की घटनास्थळावरील बचाव कार्य संपले असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानची दहशतवादी संघटना तेहरीक - ए - तालिबान पाकिस्तान (TTP) यांना या हल्ल्याची जबाबदारी स्विकाली आहे. यावेळी प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात त्यांना सुरक्षा रक्षक होते असे सांगण्यात आले होते. याचदरम्यान, क्वेट्टा ग्लॅडिएटर आणि पेशावर झलमी यांच्यात सामना सुरू होता. हा सामना क्वेट्टा येथे आयोजित करण्यात आला होता. कारण बलोच फॅन्सनी पीसीबीवर दबाव टाकला होता की त्यांना देखील पीएसल व्हेन्यूचा दर्जा मिळावा.

Pakistan Bomb Blast During PSL
Asia Cup in Pakistan : आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले जाणार ? कुठे होणार स्पर्धा...

पोलीस अधिकारी म्हणाला की, 'स्टेडियमजवळ जेव्हा बॉम ब्लास्ट झाला त्यावळी सामना बंद करण्यात आला. त्यानंतर खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. जे व्हा सुरक्षा रक्षकांकडून सामना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल आला त्यावेळी सामना पुन्हा सुरू करण्यात आला.

हा सामना पाहण्यासाठी मैदान खचाखच भरले होते. गेल्या काही वर्षांपासून अशांत बलोचिस्तानमध्ये क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या नव्हत्या. या भागातील मैदान कायम दहशतवाद्यांच्या रडारवर असतात.

हा स्फोट कशा प्रकारचा होता याबाबत अजून काही माहिती समोर आलेली. टीटीपी पाकिस्तानात दहशतवादाचा धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात पेशावरमध्ये केलेल्या हल्ल्यात 80 लोकांचा मृत्यू झाला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.