'पाक खेळपट्टी तयार करू शकत नाही, भारताची मदत घ्या'

Pakistan Can Not make spinner friendly Pitch take help from India
Pakistan Can Not make spinner friendly Pitch take help from India esakal
Updated on

ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्याची सुरूवात कसोटी मालिकने होत आहे. त्यामुळे फक्त पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातच नाही तर संपूर्ण जगभरात या कसोटी मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र रावळपिंडी आणि कराची कसोटीत पाकिस्तानने ज्या खेळपट्ट्या (Pakistan Pitch) तयार केल्या त्यामुळे क्रिकेट (Cricket) रसिकांची निराशा झाली. या दगडासारख्या खेळपट्ट्यांवरून पाकिस्तानवर जगभरातून टीका होऊ लागली आहे.

Pakistan Can Not make spinner friendly Pitch take help from India
रणजीत खेळ भावनेला ठेंगा; धोनीच्या गावकऱ्यांनी कुटल्या 1297 धावा

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राहिल्यानंतर आता लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी तयार करण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आयसीसी अकादमीचे माजी प्रमुख क्युरेटर डोबी लम्सडेन यांच्याकडे मदत मागितली आहे. पीसीबीने (PCB) लम्सडेन हे 10 दिवसांसाठी लाहोरला येणार असल्याचे स्पष्ट केले असून ते तिसऱ्या कसोटीसाठीची खेळपट्टी तयार करण्यास स्थानिक क्युरेटर्सने मदत करणार आहेत. याच दरम्यान पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आकिब दावेद यांनी पीसीबीने फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करण्यासाठी भारतीय क्युरेटरची मदत घ्यायला हवी असे वक्तव्य केले.

Pakistan Can Not make spinner friendly Pitch take help from India
IPL 2022 : 'पृथ्वी'ला फिटनेसचं ग्रहण; तरीही तो नो टेन्शन कारण...

अकिबने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की, 'तुम्हाला दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही. भारतातील (India) मुंबई, बंगळुरू, चेन्नई येथील मैदानावर राबणाऱ्या क्युरेटरची माहिती काढा आणि ते फिरकीला पोषक खेळपट्टी कशी तयार करतात याची माहिती घ्या. मला आश्चर्य वाटले की पाकिस्तान आता फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करू शकत नाही.'

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात मिळून तब्बल 2300 धावा झाल्या. तर दोन कसोटीत एकूण आठ शतके ठोकली गेली. यातील सहा शतके पाकिस्तानी फलंदाजांनी तर दोन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ठोकली होती. रावळपिंडी कसोटीत फक्त 14 तर कराची कसोटीत 28 विकेट पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.