World Cup 2023 Najam Sethi : पाकिस्तानला अहमदाबादची अ‍ॅलर्जी! PCB चेअरमन सेठींनी दिली हायब्रिड मॉडेलची धमकी

World Cup 2023 Najam Sethi
World Cup 2023 Najam Sethiesakal
Updated on

World Cup 2023 Najam Sethi : भारताने पाकिस्तानमध्ये 2023 चा आशिया कप खेळण्यास नकार दिला असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी यांनी दिली. याचबरोबर नजम सेठी यांनी याचा परिणाम हा आयसीसी स्पर्धांवर होणार असल्याची अप्रत्यक्ष धमकी देखील दिली. दरम्यान, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 चा भारत - पाकिस्तान सामना हा अहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सेठी यांनी आक्षेप घेत या ठिकाणी सामना खेळवण्यात राजकारण आहे असे म्हणत अहमदाबादमध्ये सामना खेळवण्यावर आक्षेप घेतला.

World Cup 2023 Najam Sethi
Viral Video : नाद खुळा! स्टेडियममध्ये गेला अन् खुर्च्यावर झोपून मोबाईलमध्येच बघितली मॅच

नजम सेठी यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार 'आम्ही देखील भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी अशाच प्रकारची हायब्रीड संकल्पना राबवणार. आम्ही देखील आशिया कप प्रमाणे एका त्रयस्थ ठिकाणी सामने खेळवावेत अशी मागणी करणार आहोत. पाकिस्तानला ढाका किंवा भारताने निश्चित केलेल्या कुठल्याही ठिकाणी वर्ल्डकप सामने खेळण्यास काहीच अडचण नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील अशीच पद्धत अवलंबणार आहोत. याचा अर्थ सर्व देशांचे पाकिस्तानमध्ये स्वागत आहे. मात्र भारत त्रयस्थ ठिकाणी खेळेल. या रणनितीने राजकीय अडथळा पार करता येईल.'

भारत - पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत नजम सेठी म्हणाले की, 'ज्यावेळी मी ऐकले की पाकिस्तानचा सामना अहमदाबादला होणार आहे. मी हसलो आणि स्वतःशीच म्हणालो की, एकप्रकारे आम्ही भारतात येऊ नये याची रणनिती आखली जात आहे. जर तुम्ही चेन्नई किंवा कोलकाता म्हटला असता तर ते एकवेळ चाललं असतं.'

World Cup 2023 Najam Sethi
Virat Kohli Yashasvi Jaiswal : विराटनं यशस्वीचं कौतुक करणारे ट्विट केले त्वरित डिलीट, नेटकरी म्हणतात...

ते पुढे म्हणाले की, 'मी राजकारणात जाऊ इच्छित नाही. कोणत्या एका शहरात जर आम्हाला सुरक्षेविषयी शंका आहे ते शहर म्हणजे अहमदाबाद! यात राजकीय कंगोरे आहेत. त्यामुळे याबाबत जास्त काही न बोलणंच योग्य ठरले. तुम्ही अहमदाबादमध्ये खेळणार आहात. तुम्हाला माहिती आहे ना तिथे कोणाची सत्ता आहे असं सांगण्याचा हा प्रकार आहे.'

काय आहे हॅयब्रीड मॉडेल?

हायब्रीड मॉडेलमध्ये भारत सोडून सर्व संघ पाकिस्तानमध्ये चार सामने खेळतील. त्यानंतर ते त्रयस्थ ठिकाणी त्यांचे उरलेले सामने खेळतील.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.