Asia Cup 2023: PCB चेअरमन सेठींना आलाय राग, म्हणतात आता मी देखील घरी बसून...

pakistan cricket board chief najam sethi get angry on jay shah
pakistan cricket board chief najam sethi get angry on jay shahsakal
Updated on

Najam Sethi Angry on Jay Shah : आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी गुरुवार 5 जानेवारीला 2023-24 मध्ये आशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेचा रोडमॅप जाहीर केला आहे. जय शहाच्या या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

वास्तविक, या रोडमॅपमध्ये आशिया चषक 2023 चाही उल्लेख करण्यात आला आहे, जो पाकिस्तानने आयोजित केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख नजम सेठी यांनी जय शहा यांच्यावर आरोप केला आहे की, ते या स्पर्धेचे आयोजन करत असतानाही पाकिस्तानचा सल्ला न घेता रोडमॅप जारी केला आहे. जय शहा यांनी किमान एक फोन तरी करायला हवा होता असेही त्यांनी म्हटले आहे.

pakistan cricket board chief najam sethi get angry on jay shah
Asia Cup 2023: जय शहाच्या 'या' कृत्याने PCB अध्यक्ष संतापले! पाक चाहते म्हणाले, 'पंगा घेऊ नका, आपल्यात ताकद ...'

स्पोर्ट्स टाकशी बोलताना नजम सेठी या मुद्द्यावर म्हणाले की, 'मला आश्चर्य वाटले नाही तर एकट्याने हा निर्णय घेतला यांचा राग आला. संपूर्ण परिषद होती पण त्यात कोणाशीही बोलणे झाले नाही. अशा प्रकारे उद्या मी जेव्हा प्रमुख होईल तेव्हा घरी बसून निर्णय घेईन. निदान फोन तरी करायला हवा होता.

pakistan cricket board chief najam sethi get angry on jay shah
IND vs SL: 6,6,6,6,6,6,4,4,4... अक्षरचा तांडव! ९ चेंडू ठोकले जवळपास अर्धशतक

पुढे बोलताना पीसीबी प्रमुख म्हणाले, आम्हाला सांगण्यात आलेले नाही. आमच्यासाठी हा निर्णय अचानक आला. याआधीही जय शहा यांनी विधान केले होते, ज्यावर माझ्या आधी हे पद भूषवणाऱ्या रमीज राजा यांनी आक्षेप घेतला होता. गोष्ट अशी आहे की एकीकडे तुम्हाला पाकिस्तानने विश्वचषक खेळण्यासाठी भारतात यावे असे वाटते, तर दुसरीकडे तुम्ही म्हणता की आम्ही पाकिस्तानात जाऊन आशिया कप खेळू नये. उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे, तेही खेळणार नाहीत का? हा क्रिकेटच्या सिद्धांताचा मुद्दा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.