खेळाडूंप्रमाणे पाक बोर्डाचं इंग्लिशही कच्चे! नेटकऱ्यांनी घेतली शाळा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी ट्विटच्या माध्यमातून न्यूझीलंड विरुद्धची मालिका रद्द माहिती दिली.
PAK vs NZ
PAK vs NZ
Updated on

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित सामन्यांची नियोजित मालिका ऐनवेळी रद्द झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्वत न्यूझीलंडने मालिका खेळण्यास नकार दिला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. द्विपक्षीय मालिकेसंदर्भात रंगणाऱ्या चर्चेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लिशमध्ये केलेल्या ट्विटची भर पडली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी ट्विटच्या माध्यमातून न्यूझीलंड विरुद्धची मालिका रद्द माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी ‘Fool’ या शब्दाचा चुकीचा वापर केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन जे ट्विट करण्यात आले त्यात 'Full Proof Security' असे लिहिण्याऐवजी ‘Fool Proof’ असा उल्लेख करण्यात आला होता. या अशा प्रकारामुळेच पाकिस्तान इंग्लिशवरुन नेहमी ट्रोल होते, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. एका नेटकऱ्याने स्माईलीवाली इमोजी शेअर करत पाकिस्तानची शाळा घेतली आहे.

PAK vs NZ
पाकिस्तानात असूनही न्यूझीलंडने केली वन डे मालिका रद्द, कारण...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटच्या माध्यमातून न्यूझीलंड विरुद्धची मालिका स्थगित झाल्याचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मालिका रद्द झाल्याचे म्हटले आहे. 18 वर्षांनी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार होता.

PAK vs NZ
टीम इंडिया आधी या क्रिकेट संघांनी अवलंबली Split Captaincy रणनिती

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मालिकेसंदर्भात थेट न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी चर्चाही केली होती. पण यातून कोणताही मार्ग निघाला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भातील माहितीही ट्विटच्या माध्यमातून दिली होती. सुरक्षिततेसंदर्भात न्यूझीलंडच्या संघाला आम्ही हमी दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी वैयक्तिकरित्या न्यूधीलंडला भरवसा देण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तान बोर्डाने एका ट्विचटमध्ये म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.