Babar Azam Salary : पाक क्रिकेटपटूंचा पगार चार पटीनं वाढला, मात्र भारतीय खेळाडूंच्या तुलनेत अजून गरिबी रेषेखालीच!

Babar Azam Salary PCB Central Contract
Babar Azam Salary PCB Central Contract esakal
Updated on

Babar Azam Salary PCB Central Contract : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तानच्या काही टॉप क्रिकेटपटूंची पगारवाढ केली आहे. ही पगारवाढ तब्बल 4 पटीनं करण्यात आली आहे. पीसीबीनं केलेली ही पगारवाढ ऐतिहासिक ठरली आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार पीसीबीचा वार्षिक करार हा जूनमध्ये संपला आहे. नव्या वर्षाचा करार करताना पीसीबीने आपल्या अ श्रेणीतील खेळाडूंना मिळणाऱ्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे.

Babar Azam Salary PCB Central Contract
Prithvi Shaw Video : पृथ्वी शॉ कारकीर्द सावरण्यासाठी काऊन्टी खेळायला गेला अन् भलतीच 'सुरूवात' करून बसला

पाकिस्तानच्या अ श्रेणीत तीन खेळाडूंची नावे आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी यांचा या अ श्रेणीत समावेश आहे. या खेळाडूंना प्रत्येक महिन्याला जवळपास 15900 डॉलर्स म्हणजे 13 लाख रूपये देण्यात येणार आहेत. (Babar Azam Salary Increase)

याचा अर्थ या सर्व अ श्रेणीतील खेळाडूंना आता वर्षाला 1.5 कोटी रूपये मिळतील. यापूर्वी या सर्व खेळाडूंना प्रत्येक महिन्याला 4700 डॉलर्स म्हणजे वर्षाला 46 लाख रूपये मिळत होते.

Babar Azam Salary PCB Central Contract
Crocodile Attack On Footballer : नदीत उडी मारणं भोवलं; मगरीनं फुटबॉलपटूला जिवंत खाल्लं!

भारतीय खेळाडूंच्या तुलनेत खूप नगण्य वाढ

भारतीय संघातील 4 खेळाडू हे सर्वोच्च अ प्लस श्रेणीत आहेत. या ग्रेडमध्ये जे क्रिकेटपटू हे तीनही फॉरमॅटमध्ये खेळत असतात त्यांचा समावेश असतो. (Virat Kohli Salary)

सध्याच्या करारानुसार अ प्लस श्रेणीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूला बीसीसीआय वर्षाला 7 कोटी रूपये देते.

पाकिस्तानचे खेळाडू लखपती पासून करोडपती झाले आहेत. मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलने ते खूप मागे आहेत. इंग्लंडचे खेळाडू हे पगाराच्या बाबतीत भारतीय खेळाडूंच्याही पुढे आहेत. त्यांच्या टॉप ग्रेडच्या खेळाडूंना वर्षाला जवळपास 10 कोटी रूपये मिळतात.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.