WTC Points Table : पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) बांगलादेश (Bangladesh Cricket Team) विरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिका विजयासह पाकिस्तान संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (ICC World Test Championship) आपले स्थान आणखी भक्कम केले. पाक-बांगलादेश यांच्यातील निकालानंतर पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने विजयाची टक्केवारीच्या सुधारणेसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ अव्व्लस्थानी आहे. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे शंभर टक्के विनिंग पर्सेटेंजसह ते अव्वलस्थानी आहेत. पाकिस्तान विरुद्ध मालिका गमावल्यानंतर बांगलादेशचा संघ गुणतालिकेत तळाला गेलाय. त्यांनी एकही सामना जिंकलेला नाही.
पाकिस्तान संघाने बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 8 विकेट्सनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात पावासाचा अडथळा आला. पावसामुळे सामना रद्द होईल आणि घरच्या मैदानावर ओढावणारी नामुष्की टळेल, अशी आशा बाळगून असलेल्या बांगलादेशच्या पदरी निराशा पडली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेश संघाचा 1 डाव आणि 8 धावांनी धुव्वा उडवला.
WTC गुणतालिकेत श्रीलंका आणि पाकिस्तान संघानंतर टीम इंडियाचा नंबर लागतो. भारतीय संघ 58.33 पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानावर आहे. घरच्या मैदानात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला 1-0 असे पराभूत केले होते. भारतानंतर इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड यांचा नंबर लागतो. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका मोठ्या फरकाने जिंकून पाकिस्तानला ओव्हरटेक करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.