बाबर आझम सर्वात वेगाने 10,000 धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 10,000 धावा पूर्ण करणारा बाबर हा आशियातील सर्वात वेगवान फलंदाज
Pakistan cricketer Babar Azam
Pakistan cricketer Babar Azamsakal
Updated on

Pakistan cricketer Babar Azam 10000 Run International Cricket : पाकिस्तानचा कर्णधार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक विशेष विक्रम केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. बाबरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10000 धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा तो पाकिस्तानचा 11वा फलंदाज बनला आहे.

Pakistan cricketer Babar Azam
'या' धडाकेबाज फलंदाजाने T20 क्रिकेटमधून घेतली अचानक निवृत्ती

बाबरने 204 आंतरराष्ट्रीय सामन्यात कारकिर्दीतील दहा हजार धावा पूर्ण केल्या. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 10,000 धावा पूर्ण करणारा बाबर हा आशियातील सर्वात वेगवान फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा बाबर जगातील पाचवा फलंदाज आहे. त्याच्या वर सर व्हिव्ह रिचर्ड्स, हाशिम आमला, ब्रायन लारा आणि जो रूट आहेत.

बाबर आझमने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. कोहलीने 232 डावांमध्ये हा विक्रम केला होता, मात्र बाबरने 228 व्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या.

Pakistan cricketer Babar Azam
VIDEO: लंडनच्या रस्त्यावर फिरणे कॅप्टन कूलला पडले महागात, पुढे जे घडले ते...

सर्वात जलद 10 हजार धावा करणारा आशियाई फलंदाज-

  • 228 - बाबर आझम

  • 232 - विराट कोहली

  • 243 - सुनील गावस्कर

  • 248 - जावेद मियाँदाद

  • 253 - सौरव गांगुली

सर्वात जलद 10,000 आंतरराष्ट्रीय धावा

  • व्हिव्ह रिचर्ड्स - 206 डाव

  • हाशिम आमला - 217 डाव

  • ब्रायन लारा - 220 डाव

  • जो रूट - 222 डाव

  • बाबर आझम - 228 डाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.