PAK vs AFG : झुंजार अफगाणींनी 130 धावातही पाकला रडवले, अखेर नसीम शाह आडवा आला

Pakistan Defeat Afghanistan In Asia Cup 2022 Super 4 India Final Hope Finished
Pakistan Defeat Afghanistan In Asia Cup 2022 Super 4 India Final Hope Finishedesakal
Updated on

Asia Cup 2022 Pakistan vs Afghanistan Super Four : आशिया कप सुपर 4 च्या चौथ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानविरूद्ध फक्त 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या माफक आव्हान पार करताना देखील अफगाणी गोलंदाजांनी पाकिस्तानला घाम फोडला. अखेर नसीम शाहने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारत पाकिस्तानला फायनलचा रस्ता दाखवला. पाकिस्तानने 1 विकेट्सनी निसटता विजय मिळवला. भारतासाठी देखील हा सामना महत्वाचा होता. मात्र नसीम शाहच्या सलग दोन षटकारांनी या आशा देखील धुळीस मिळवल्या. (Pakistan Defeat Afghanistan In Asia Cup 2022 Super 4 India Final Hope Finished)

अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकी आणि फरीद अहमद मलिकने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर राशिद खानने दोन सेट फलंदाज बाद करत पाकचे कंबरडे मोडले.

Pakistan Defeat Afghanistan In Asia Cup 2022 Super 4 India Final Hope Finished
ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत रिझवान टी 20 चा नवा बादशाह; किंग कोहलीही वधारला

अफगाणिस्तानचे 130 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला फजलहक फारूकीने दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार बाबर आझमला शुन्यावर बाद केले. बाबर बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरून धरला.

मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानला ठराविक अंतराने धक्के देणे सुरूच ठेवले. फखर झमान 5 धावांवर धावबाद झाला. अफगाणी फिरकीपटूंनी टिच्चून मारा करत रिझवानला जास्त हात खोलण्याची संधीच दिली नाही. अशा परिस्थिती देखील रिझवान आणि इफ्तिकार अहमद यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला.

Pakistan Defeat Afghanistan In Asia Cup 2022 Super 4 India Final Hope Finished
PAK vs AFG : धडाकेबाज सुरूवातीनंतर अफगाणिस्तान 129 धावात ढेपाळली

मात्र राशिद खानने पाकिस्तानला नवव्या षटकात मोठा धक्का दिला. त्याने रिझवानला 20 धावांवर बाद केले. रिझवान बाद झाल्यानंतर इफ्तिकारने शादाबसोबत भागीदारी रचत पाकिस्तानला 16 व्या षटकात 87 धावांपर्यंत पोहचवले. मात्र फरीद अहमदने 33 चेंडूत 30 धावा करणाऱ्या इफ्तिकार अहमदला बाद केला. पाठोपाठ राशिद खानने देखील 26 चेंडूत 36 धावांची खेळी करणाऱ्या शादाब खानला मोक्याच्या क्षणी बाद केले.

राशिदने अफगाणिस्तानला सामन्यात पुन्हा आणले होते. याचा फायदा घेत फारूकीने मोहम्मद नवाजला 4 धावांवर बाद केले. फारूकीने 18 व्या षटकात दोन विकेट घेत पाकिस्तानची अवस्था 7 बाद 109 धावा अशी केली. यानंतर 19 व्या षटकात फरीद अहमदने हारिस रौऊफचा त्रिफळा उडवत 8 बाद 110 अशी केली.

Pakistan Defeat Afghanistan In Asia Cup 2022 Super 4 India Final Hope Finished
IND vs PAK : क्रिकेट सोडा! इकडं भारतीय महिला फुटबॉल संघानं पाकला धूळ चारली

पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूत 20 धावांची गरज होती. पाकिस्तानची सर्व मदार आसिफ अलीवर होती. त्याने फरीदला षटकार मारत सामना 8 चेंडू 12 दावा असा आणला. मात्र पुढच्याच चेंडूवर फरीदने अलीला 16 धावांवर बाद केले. आता अफगाणिस्ताला विजयासाठी फक्त एक विकेट होती. विजयासाठी सहा चेंडूत 11 धावांची गरज असताना नसीम शाहने पहिल्याच चेंडूवर फारूकीला षटकार मारत सामना 5 चेंडू 5 धावा आणला. नसीम शाहने दुसऱ्याही चेंडूवर षटाकर मारत सामना संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.