Pakistan Defeat Bangladesh Reached In Semi Final : पाकिस्तानने बांगलादेशचा 5 विकेट्सनी पराभव करत 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. याचबरोबर पाकिस्तान रडत खडत का असेना सेमी फायनलमध्ये पोहचला. आजच्या पहिल्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानची चांदी झाली. जरी पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला असला तरी बांगलादेशेचे 127 धावांचे आव्हान पार करताना पाकिस्तानचा निम्मा संघ खर्ची पडला.
दरम्यान, पाकिस्तानने बांगलादेशचे 128 धावांचे आव्हान पार करताना 10 षटकात 57 धावांची सावध सलामी दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशने जोरदार पुनरागमन करत बाबर आझमला 25 तर मोहम्मद रिझवानला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानची धवगती मंदावली. तसेच मोहम्मद नवाझ देखील 11 चेंडूत 4 धावा करून धावबाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची 15 व्या षटकात 3 बाद 92 अशी अवस्था झाली होती.
मात्र त्यानंतर मोहम्मद हारिस आणि शान मसूद यांनी आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ पोहचवले. मात्र विजयासाठई 7 धावांची गरज असताना हारिस 18 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. दरम्यान, इफ्तिकार अहमद आणि शान मसूदने सामना 13 चेंडूत 2 धावा असा आणला. मात्र मुस्तफिजूरने इफ्तिकारला 1 धावेवर बाद करत पाकिस्तानचा 5 वा फलंदाज माघारी धाडला. अखेर शान मसूदने विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 127 धावात रोखले. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने मोक्याच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावत बांगलादेशचे 4 बळी टिपले. तर बांगलादेशकडून नजमुल हुसैन शांतोने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.