IBSA World Games: भारताचे स्वप्न भंगले! पाकिस्तानने टीम इंडियाला धूळ चारली अन् जिंकले सुवर्णपदक

IBSA World Games: भारताचे स्वप्न भंगले! पाकिस्तानने टीम इंडियाला धूळ चारली अन् जिंकले सुवर्णपदक
Updated on

IBSA World Games Final Ind vs Pak : शनिवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाला पाकिस्तानकडून ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पाकिस्तानने सुवर्णपदकावर कब्जा केला.

या वर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा महासंघाच्या जागतिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आणि भारतीय पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला संघाने विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला.

IBSA World Games: भारताचे स्वप्न भंगले! पाकिस्तानने टीम इंडियाला धूळ चारली अन् जिंकले सुवर्णपदक
Pakistan No-1 ODI Ranking : आशिया कपआधी पाकिस्तानचा धमाका! ODI मध्ये बनला नंबर वन, कुठे आहे टीम इंडिया?

20-20 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. व्हीआर ड्युनासोबत पहिल्या सहा षटकांत 50 धावांची भागीदारी करून डीआर टोम्पकीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. ड्युनाने 18 चेंडूत 20 तर टोमपाकीने 51 चेंडूत 11 चौकारांसह 76 धावा केल्या. एस रमेशनेही 29 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी खेळून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

IBSA World Games: भारताचे स्वप्न भंगले! पाकिस्तानने टीम इंडियाला धूळ चारली अन् जिंकले सुवर्णपदक
Viral Video: धावबाद बॅट्समनचा राग बेतला खेळाडूच्या जीवावर; पाहा नेमकं काय झालं?

185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 15 व्या षटकातच विजयाची नोंद केली. गोलंदाजीमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. त्यांनी अतिरिक्त म्हणून 42 धावा खर्च केल्या, ज्यामुळे पाकिस्तानला विजयाची नोंद करणे सोपे झाले.

IBSA वर्ल्ड गेम्स किंवा वर्ल्ड ब्लाइंड गेम्स ही आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा महासंघातर्फे दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या इव्हेंटमुळे अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या खेळाडूंना विविध खेळांमध्ये स्पर्धा करता येते. हे पहिल्यांदा 1998 मध्ये माद्रिद, स्पेन येथे आयोजित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.