South Africa T20 League Zainab Abbas : क्रिकेटच्या मैदानावर अशी काही दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात, जी पाहून सर्वांनाच आश्चर्यही वाटते. आता असेच एक दृश्य दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेल्या नव्या टी-20 लीगमध्ये पाहायला मिळाले. या लीगदरम्यान पाकिस्तानी अँकरसोबत असे काही घडले, जे पाहून लोकांचे हसू आवरले नाही.
पाकिस्तानची प्रसिद्ध अँकर झैनब अब्बास SA20 मध्ये अँकरिंग करत आहे. 18 जानेवारीला खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये त्याच्यासोबत असे काही घडले, जे पाहून सगळेच थक्क झाले. खरं तर, SA20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि सनरायझर्स इस्टर्न कॅप यांच्यात सामना खेळला जात होता.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सनरायझर्सला 172 धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईकडून लक्ष्य गाठण्यासाठी सनरायझर्सचे खेळाडू जबरदस्त फटकेबाजी करत होते. त्याचवेळी जैनब अब्बास सीमेजवळ उभी मुलाखत घेत होती.
सनरायझर्सच्या डावातील 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज मार्को जॅन्सन स्ट्राइकवर होता. त्याने सॅम करणच्या चेंडूवर एक शॉट खेळला जो थेट सीमारेषेच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूच्या मागे धावत होता. तेवढ्यात सीमारेषेवर इंटरव्ह्यू करत असलेल्या पाकिस्तानी अँकरला फिल्डरने टक्कर दिली. त्यामुळे अँकर जोरात जमिनीवर पडली.
कोण आहे झैनब अब्बास ? (Who is Zainab Abbas)
झैनब अब्बास ही पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. तिने आयसीसी स्पर्धांमध्ये यजमानपदाची भूमिकाही बजावली आहे. जैनब पाकिस्तानमधील सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. झैनबचे वडील देशांतर्गत क्रिकेटपटू राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.