Suryakumar Yadav : 42 चेंडूत 97 धावा चोपणारा पाकिस्तानी फलंदाज म्हणतो सूर्या माझ्यासमोर पाणी भरतोय?

Suryakumar Yadav Azam Khan
Suryakumar Yadav Azam Khanesakal
Updated on

Suryakumar Yadav Azam Khan : पाकिस्तानचा माजी विकेटकिपर मोहसीन खान यांच्या चिरंजीव आझम खान हा पाकिस्तानातील स्थानिक क्रिकेट गाजवत आहे. विशेष म्हणजे आझम खान आपल्या स्फोटक फलंदाजीसोबतच वजनदार व्यक्तीमत्वासाठी प्रसिद्ध आहे.

पाकिस्तान प्रीमियर लीगमधील सामन्यात क्वेट्टा ग्लॅडिएटरविरूद्ध खेळताना इस्लामाबाद युनायटेडच्या आझम खानने 42 चेंडूत 97 धावा चोपल्या. या खेळीत आझम खानने आठ षटकार आणि नऊ चौकार मारले. या खेळीनंतर एका व्हिडिओत आझम खान हा स्वतःला भारताचा 360 डिग्री क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवपेक्षा स्वतःला चांगला खेळाडू म्हणत असल्याचे दिसून येते.

Suryakumar Yadav Azam Khan
Sourav Ganguly KL Rahul : जर भारतातच धावा केल्या नाहीत तर... गांगुलीने केएल राहुलला दिल्या कानपिचक्या

सूर्यकुमारसोबत तुलना करण्यात येणाऱ्या 140 किलो वजनाच्या आझम खान म्हणाला की, भारताचा स्टार खेळाडू नाही तर ऑस्ट्रेलियाचा टीम डेविड हा त्याचा हिरो आहे. आपली खेळण्याच्या स्टाईल ही डेविडशी जोडत आझम म्हणाला की, फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये आम्ही दोघं एकाच नंबरवर फलंदाजी करतोय. सूर्या वन डाऊन फलंदाजी करतो तिथे तुलनेने कमी दबाव असतो. मात्र मी जास्त दबावात फलंदाजी करतो. हे सांगत असताना आझम खान याची बॉडी लँग्वेज वेगळच काही सांगून जात होती.

Suryakumar Yadav Azam Khan
IND vs AUS Indore Pitch Report : इंदौर कसोटी भारताला देणार धोका; खेळपट्टी पाहून स्मिथचा चेहरा खुलणार?

आझम म्हणाला, 'तुम्ही जाणताच की मी ज्या स्थानावर फलंदाजी करतोय तेथे फलंदाजी करणे खूप कठीण असते. धावा 4 बाद 40 धावा अशा असतात. तर कधी 2 विकेटवर 180 धावा असतात. यावेळी तुम्हाला सामना संपवण्याची गरज असते. ही वास्तवात कठिण भुमिका आहे. सध्या मी टीम डेविडकडून प्रेरणा घेत आहे. तो मोठे फटके मारतो. मी त्याची फलंदाजी ओळखतो कारण मी त्याच स्थानावर फलंदाजी करतो.'

(Sports Latest News)

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.