'हा वर्ल्डकप ICC चा नाही तर...' पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम डायरेक्टरचा सुटला संयम! BCCI वर केलं गंभीर आरोप

 India vs Pakistan Mickey Arthur
India vs Pakistan Mickey Arthur sakal
Updated on

India vs Pakistan Mickey Arthur : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने दणदणीत विजय नोंदवला.

पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानंतर भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांनी बीसीसीआयचा समाचार घेतला आहे.

 India vs Pakistan Mickey Arthur
Ind vs Pak : 'सगळं काही अचानक घडलं, रोहित शर्मा...' लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान कर्णधार बाबरचं मोठे वक्तव्य

सामना संपल्यानंतर मिकी आर्थरने सांगितले की, 'मी काही म्हटले तर चुकीचे ठरेल. पण आज रात्री आयसीसी टूर्नामेंटची मॅच वाटत नव्हती. तो बीसीसीआयचा एक इव्हेंट वाटत होता. बीसीसीआय द्विपक्षीय मालिका आयोजित करत आहे असे दिसल. मी 'दिल दिल पाकिस्तान' ऐकले नाही. त्यामुळे नक्कीच फरक पडतो, सामन्यात वातावरण निर्माण होते. त्यानंतर त्यांना अधिक विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत मला दंड ठोठावायचा नाही, असे सांगितले.

 India vs Pakistan Mickey Arthur
Rohit Sharma : पाकिस्तानवरील विजयानंतरही रोहित नाही फार उत्साही... म्हणतो फिंगर क्रॉस

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग तिसरा विजय नोंदवला. तर पाकिस्तानी संघाला 2023च्या वर्ल्डकप स्पर्धेत पहिला पराभव स्वीकारावा लागला.

नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीला आला आणि 42.5 षटकात सर्व 10 विकेट गमावून केवळ 191 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने रोहित शर्माच्या शानदार 86 धावांच्या जोरावर 30.3 षटकांत तीन गडी गमावून 192 धावा केल्या. रोहित शर्माने या शानदार खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()