VIDEO: सुपरमॅन स्टाईल मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा झेल

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आता इंग्लंडमध्ये कौंटी चॅम्पियनशिप खेळत आहे
VIDEO: सुपरमॅन स्टाईल मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा झेल
Updated on

County Championship : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आता इंग्लंडमध्ये कौंटी चॅम्पियनशिप खेळत आहे. डरहमविरुद्धच्या सामन्यात आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन करत आहे. फलंदाजीत अर्धशतक झळकावल्यानंतर रिझवाननेही गोलंदाजी करताना दिसला. त्यानंतर सामन्यादरम्यान त्याने आश्चर्यकारक झेल पकडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. (Mohammad Rizwan Superman Catch)

VIDEO: सुपरमॅन स्टाईल मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा झेल
जडेजाच नव्हे, या १० खेळाडूंनाही IPL मध्येअर्ध्यातच सोडावे लागले कर्णधारपद

रिझवानने फलंदाजीत 145 चेंडूंचा सामना करत सात चौकारने 79 धावा केल्या आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने 203 धावा केल्या. सोबत दोघांनी सहाव्या विकेटसाठी 154 धावांची पार्टनरशिप केली. त्यामुळे ससेक्सने पहिल्या डावात 500 धावांचा टप्पा ओलांडता आला. यानंतर डरहमचा सलामीचा फलंदाज शीन डिक्सनने 186 धावा केल्या. त्याच्या डावाच्या 103व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार स्कॉट बोर्थविक बचाव करताना 12 धावावर झेलबाद झाला.

VIDEO: सुपरमॅन स्टाईल मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा झेल
गावसकराचा दावा; T-20 वर्ल्डकप वेळी भारतीय यॉर्कर किंगची होणार धमाकेदार एंट्री

कर्णधार स्कॉट बोर्थविकचा चेंडू बॅटची कड घेऊन तो रिझवानकडे गेली. त्याने डाव्या बाजूने हवेत उडी मारून एका हातात झेल घेतला. त्याचा झेल इतका नेत्रदीपक होता की बोर्थविक उभा राहून पाहत राहिला होता. हा सामना अनिर्णित राहिला. डरहमने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात ससेक्सने 538 धावा केल्या होत्या. यानंतर डरहमने 3 बाद 364 धावा करून दुसरा डाव घोषित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()