PAK vs SL : रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान Asia Cupमधून बाहेर! फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार श्रीलंका

Sri Lanka Beat Pakistan By 2 Wickets To Reach Final
Sri Lanka Beat Pakistan By 2 Wickets To Reach Finalsakal
Updated on

Sri Lanka Beat Pakistan By 2 Wickets To Reach Final : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन विकेटने पराभव केला आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचा मुकाबला भारताविरुद्ध होईल. या पराभवामुळे पाकचे आव्हान संपुष्टात आले.

पावसाने दोन वेळा अडथळा आणल्याने पाकिस्तान श्रीलंका दरम्यानचा सामना ४२ षटकांचा करण्यात आला. विकेट किपर फलंदाज मोहंमद रिझवानने केलेल्या नाबाद ८६ धावांच्या खेळीने पाकिस्तानला श्रीलंकेसमोर ४२ षटकात ७ बाद २५२चा धावफलक उभारता आला.

Sri Lanka Beat Pakistan By 2 Wickets To Reach Final
Asian Games 2023 : एशियन गेम्समधील क्रिकेट सामन्यांच संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

श्रीलंकन फलंदाजांनी धीराने फलंदाजी करून कठीण वाटणारा विजय शेवटच्या षटकात खेचून आणला. कुशल मेंडीसच्या ९१ आणि प्रचंड दडपणाखाली असलंकाच्या नाबाद ४९ धावा विजयासाठी निर्णायक ठरल्या.

श्रीलंकन सलामीच्या जोडीने धावांचा पाठलाग जोमाने चालू केला होता. कुशल परेराने शाहीन शाह आफ्रिदीला ३ कडक चौकार मारून आशा वाढवल्या. पण धावपळू का नको या द्विधा अवस्थेत परेरा धावबाद झाला आणि श्रीलंकन प्रेक्षक हळहळले. षटकामागे ६ पेक्षा जास्त धावांची सरासरी राखत फलंदाज चांगली फलंदाजी करत होते. खराब चेंडूंवर चौकार मारत होते पण त्यांना चांगल्या चेंडूवर एकेरी धावा जास्त काढता येत नव्हत्या.

कुशल मेंडीस आणि सदीराने शतकी भागीदारी केल्याने विजय शक्य वाटू लागला. मोक्याच्या क्षणी सदीरा, कप्तान शनका आणि धनंजया बाद झाले. ४१ व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीने फक्त ४ धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. आणि शेवटच्या षटकात पदार्पण करणाऱ्या झमानने अचूक मारा करून दडपण आणले. तरी असलंकाने डोके शांत ठेवून शेवटच्या षटकात गरजेच्या ८ धावा काढून विजय हाती घेतला. श्रीलंकेने अंतिम सामन्या प्रवेश करून प्रेक्षकांना आनंदाने बेभान केले.

Sri Lanka Beat Pakistan By 2 Wickets To Reach Final
Ban Ind vs Pak:भाजपचं आंदोलन अन् नेटिझन्सची भारत - पाकिस्तान सामने ban करण्याची मागणी.. काय आहे प्रकरण घ्या जाणून

सलामीला फलंदाजी करायची संधी मिळालेल्या अब्दुल्ला शफीकने कप्तान बाबर आझमसह डाव सुधारला. बाबर आझमपेक्षा अब्दुल्ला जास्त विश्वासाने फटकेबाजी करत होता. चेंडूवर नजर बसलेल्या बाबर आझमला वेल्लालगेने चेंडूला सुंदर हवा देत चकवले आणि कुशल मेंडीसने क्षणार्धात त्याला यष्टिचीत केले. मधल्या टप्प्यात मोहम्मद हॅरीस आणि मोहम्मद नवाज जास्त लढत न देता बाद झाले.

५ बाद १३० अशा अर्धवट धावसंख्येवरून रिझवान - इफ्तखारची जोडी कामाला लागली. दोघांनी प्रथम जम बसायला वेळ घेताना पळून धावा काढल्या. दोघांनी मिळून अत्यंत योग्यवेळी ८१ चेंडूत शतकी भागीदारी केली. इफ्तखार ४७ धावा करून बाद झाला. रिझवान ७३ चेंडूत ८६ धावा करून नाबाद राहिला.

सक्षिप्त धावफलक : पाक ४२ षटकांत ७ बाद २५२ (अब्दुल्ला सैफिक ५२, बाबार आझम २९, मोहम्मद रिझवान नाबाद ८६ - ७३ चेंडू, ६ चौकार २ षटकार, इफ्तेकार अहमद ४७ ४० चेंडू, ४ चौकार, २ षटकार, प्रमोद मदुशान ५८-२, मथिशा पथिराना ६५- ३) (डकवर्थ लुईस सुत्रानुसार २५२ धावांचे आव्हान ) श्रीलंका ४२ षटकांत ८ बाद २५२ ( पाथून निसांका २९, कुशल मेंडिस ९१ -८७ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, समरविक्रमा ४८ - ५१ चेंडू, ४ चौकार, चरिथ असलंका नाबाद ४९, शाहिन शाह आफ्रिदी ५२ - २, इफ्तेकार अहमद ५०-३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.